करोना महामारीदरम्यान डिजिटलायझेशन झपाट्याने वाढले, यामुळे आता मिटिंग असो की पॅनल डिस्कशन सर्वकाही ऑनलाइन पद्धतीने होताना दिसते. घरी बसून लोक मिटिंग, पॅनल डिस्कशन, डिबेट किंवा टीव्ही कार्यक्रमात सहभागी होतात. पण प्रत्येक गोष्टीचा दोन बाजू असतात. एक चांगली आणि दुसरी वाईट. तशीच या ऑनलाईन मिटिंग किंवा कार्यक्रमांनाही एक वाईट बाजू आहे, ती म्हणजे थेट लाईव्ह सुरु असताना अचानक कोणीतरी कुटुंबातील सदस्य येतो आणि पटकन काही तरी बोलतो, ज्या गोष्टी आपण रोखू शकत नाही. असाच काहीसा प्रकार एका पाकिस्तानी क्रिकेट एक्स्पर्टच्या बाबतीत घडला, तो लाईव्ह शोदरम्यान बोलत असताना अचानक त्याची बायको आली आणि ती काहीतरी बोलू लागली. यावेळी संतापलेल्या एक्सपर्ट कसलाही विचार न करता तिला लाईव्ह शोदरम्यान फटकवले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील युजर्स हा व्हिडीओ पाहून खूप मज्जा घेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी क्रिकेट एक्सपर्ट मोहसिन अली यूट्यूब लाईव्हवर बोलत असताना मध्येच त्याची पत्नी आणि ती काहीतरी बोलू लागली. यावेळी बेडवर बसलेल्या मोहसिन याने पत्नीला हाताने मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी रिझवान हैदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

हा व्हिडीओ अनेकांना खूप मजेशीर दिसत असला तरी काहींनी त्यात घरगुती हिंसाचार असल्याचं म्हटलं आहे. कारण यावेळी सूत्रसंचालक रिझवाननेही लगेच त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. यावर मोहसिनने सांगितले की, ३१ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. तो आजही त्याच्या पत्नीबरोबर राहतो. यावरुन तो महिला आणि पत्नीची किती आदर करतो हे दिसून येते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, काकांसाठी ही सर्व सामान्य गोष्ट आहे. तर आणखी एका युजरने लिहिले की, या पाकिस्तानींकडून आणखी काय अपेक्षा करता येईल.