सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्यक्ती एका दिवसात स्टार बनते. गेल्या काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी तरुणीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. नेटकरी या व्हिडिओला खूप लाइक आणि फॉरवर्ड करत होते. आता त्याच तरुणीबद्दल धक्कादायक माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे आयेशाचा मृत्यू झाल्याची माहिती व्हायरल होत आहे.

आयेशा मानो नावाच्या या तरुणीने तिच्या स्वत:च्या मेहंदी कार्यक्रमात ‘मेरा दिल ये पुकारे आजा..’ या गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा व्हिडीओ केवळ पाकिस्तानच नाही तर भारत आणि इतर देशांमध्येही गाजला होता. आयेशाच्या मृत्यूच्या पोस्टने नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे, तर काहींनी त्या वृत्तामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र या बातमीच फक्त इतकंच सत्य आहे की आयेशाचं निधन झालं आहे. मात्र ती आयेशा ही पाकिस्तानी तरुणी आयेशा मानो नाही, तर आयेशा हनीफ आहे. या दोघांमधील साम्य म्हणजे दोघीसुद्धा टिकटॉकर आहेत. नावातही साम्य आढळल्याने सोशल मीडियावर हा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेकजण आयेशा मानोचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

ट्विट व्हायरल

हेही वाचा – Cobra viral video: घरातल्या डस्टबिनखाली लपला होता विषारी नाग; पाहून सारेच हादरले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यानं फेम मिळवलेल्या या मुलीनं एका लग्नात हा डान्स केला होता त्यानंतर रातोरात ती फेमस झाली होती. आयेशाने स्वत: याबाबत कुठेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.