Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विशेष करुन जेव्हा मुलींचा अपघात होतो तेव्हा त्यांना पापा की परी म्हणत ट्रोल केले जाते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीने थेट घराच्या छतावर स्कुटी चढवली. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की डबल सीट स्कुटी चालवणाऱ्या एका मुलीने थेट स्कुटी घराच्या छतावर चढवली. ती आणि तिच्या स्कुटीवर मागे बसलेली मुलगी घराच्या छतावर स्कुटीसह अडकलेल्या दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.सोशल मीडियावर स्कुटी चालवणाऱ्या मुलींच्या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.असाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्कुटी चालवणाऱ्या एका तरुणीने तिची स्कुटी थेट एका घराच्या छतावर चढवली. रस्त्याने जाताना तिचा तोल गेला असावा आणि त्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. विशेष म्हणजे ही तरुणी एकटी नव्हती तर तिच्याबरोबर स्कुटीवर डबल सीट बसलेली आणखी एक मुलगी होती. या दोन्ही मुली स्कुटीसह छतावर अडकलेल्या दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओत तुम्हाला काही लोकं दिसतील जे या मुलींना छतावरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : भारतीय पदार्थाची परदेशी शेफला भुरळ, बनवला ‘असा’ चटपटीत समोसा की…. VIDEO पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Jitendra pratap singh?? या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विचार करा, हा अपघात कसा झाला असेल..ती स्त्री आहे.. ती काहीही करू शकते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “रस्त्यात घर बनवाल तर काय होईल. या मुलींची कोणतीही चूक नाही. ज्याचे घर आहे, त्याला ताब्यात घ्या” तर एका युजरने लिहिलेय, “स्कुटी आहे ताई, हेलिकॉप्टर नाही” आणखी एका युजरने लिहिलेय,”पापाची परी उडून कुठे पोहचली”