Delhi to Goa Indigo flight viral video: गेल्या काही दिवसांपासून विमानात प्रवासात काही ना काही भन्नाट घडत असल्याचं समोर येत आहे. कधी वैमानिक कविता म्हणत प्रवाशांचं मनोरंजन करतो तर कधी प्रवशांमध्येच तुंबळ हाणामारी होते. सोशल मीडियावर अशा घटना तुफान व्हायरल झाल्या असून नेटकऱ्यांचंही जबरदस्त मनोरंजन होताना दिसत आहे. दिल्लीवरून गोव्याच्या मोपा विमानतळाच्या दिशेनं उड्डाण केलेल्या इंडिगो विमानातील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. इंडिगो विमानात एका प्रवाशानं ‘बिअर मिळेल का? ‘ अशी भन्नाट मागणी कॅबिन क्रू’कडे केली अन् भर विमानात एकच हशा पिकला. प्रवाशानं बिअरची केलेली मागणी कॅमेराद कैद झाली असून कॅबिन क्रूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रवाशाने विमानात केलेल्या बिअरच्या मागणीचा व्हिडीओ झाला व्हायरल

गोव्याकडे प्रवास करत असताना रंगतदार पार्टी करून एन्जॉय कसं करता येईल, याच विचारात काही प्रवासी असतात. आपण कुठे आहेत, काय करतोय? याचं भानंही काही प्रवाशांना नसतं. मौजमजा करण्यासाठी थेट विमानातच काही प्रवासी भन्नाट कृत्य करताना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहेत. दिल्लीवरून गोव्याच्या मोपा विमानतळावर निघालेल्या इंडिगो विमानात एका प्रवशानं कॅबिन क्रू कडे चक्क बिअरची मागणी केली. त्याचा हा भन्नाट प्रश्न ऐकून सर्वच प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

नक्की वाचा – Video : सलाम या बॉडी बिल्डरला! पठ्ठ्याने चक्क दातांनीच ओढला १५००० किलो वजनी ट्रक, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डलाच घातली गवसणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅबिन क्रू विमानात प्रवाशांचं स्वागत करताना या व्हिडीओत दिसत आहे. विमानात असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्रवशांमध्येही गोव्याला जाण्याचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांना मोपाच्या नवीन विमानतळावर प्रवास करताना पाहण्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत, अशी घोषणा कॅबिन क्रू विमनात करताना व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी एक प्रवासी कॅबिन क्रूकडे चक्क बिअरची मागणी करत असल्याचं या व्हिडीओत ऐकू येत आहे. प्रवाशाने केलेल्या या भन्नाट मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर प्रवाशांनीही भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं होतं.