Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवतात काही रडवतात कर काही व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापुरते मर्यादित नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. प्रत्येकालाच मनासारखं हवं तसं आयुष्य जगता येत नाही. काहीवेळा परिस्थितीमुळे आवड आणि निवड ही वेगवेगळी होते. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये कटू वस्तूस्थिती पाहायला मिळाली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल.

जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. तारुण्यात प्रत्येकाचेच वेगवेगळे शौक असतात, स्वप्न असतात. काहींचे पूर्ण होतात तर काहींची स्वप्न ही स्वप्नच राहतात. अशाच दोन व्यक्तींचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एकीकडे आवड तर दुसरीकडे जबाबदारी पाहायला मिळाली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तरुणांमध्ये गाड्यांची प्रंड क्रेझ असते. प्रत्येक तरुणाची ड्रीम बाईक ही असतेच मात्र प्रत्येक तरुणाला ती मिळतेच असं नाही. असंच चित्र या व्हिडीओतून पाहायला मिळालं आहे. एकीकडे तरुण त्याची स्पोर्ट बाईक चावतोय तर दुसरीकडे एक व्यक्ती साधी बाईक चालवतोय. यातून एकीकडे तरुणाची आवड पूर्ण झालीये तर दुसऱ्या व्यक्तीची आवड मात्र जबाबदारीमुळे पूर्ण होऊ शकलेली नाही.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “तुमच्या गाडीची काच माझ्याकडून तुटली…” तरुणानं गाडीला लावली चिठ्ठी; वाचून मालकानं काय केलं पाहा

हा व्हिडीओ rahulsoni_1997 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. एका यूजरने लिहिले की, “जेव्हा आवड आणि जबाबदारी समोरा समोर येते.”