आपल्याला एखाद्या जागेवर वेळेत पोहोचणे आवश्यक असेल, मात्र तुम्ही जर प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलात तर काय कराल? अनेक जण गाडीमध्ये बसल्या बसल्या वैतागून चालकाबरोबर गाड्यांची वाढती संख्या, ट्रॅफिक, प्रदूषण या गोष्टींवर चर्चा करत राहतील; तर काही आपल्या फोनमधील मॅपमध्ये किती मोठा ट्रॅफिक आहे किंवा इतर गोष्टींविषयी माहिती वाचत बसतील. मात्र, स्वतःच्या लग्नाला जात असताना असा ट्रॅफिक लागला तर? असाच किस्सा बंगळुरूमधील एका नवरीबरोबर घडल्याचे सोशल मीडियावरून समजते. बंगळुरूमधील भयंकर गर्दीत नवरीची गाडी अडकली होती. अशा वेळेस मुहूर्त चुकू नये यासाठी तिने भन्नाट शक्कल लढवल्याचे व्हायरल होणाऱ्या पोस्टवरून समजते.

आता आपण बंगळुरू आणि त्या शहरातील ट्रॅफिकबद्दल सतत कुठे ना कुठे वाचत असतो, ऐकत असतो. अशात बंगळुरूमध्ये स्वतःच्या लग्नाच्या हॉलवर जाण्यासाठी नवरी आणि घरातील काही मंडळी एका गाडीमधून निघाले होते. मात्र, गाडी प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकली. लग्नाच्या मुहूर्ताची वेळ चुकू नये एवढेच त्या नवरीचे ध्येय होते. त्यामुळे तिने हुशारीने स्वतःची गाडी सोडून दिली आणि मेट्रो स्टेशन गाठले.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?

हेही वाचा : Viral video : रुबिक्स क्यूबच्या मदतीने साकारले प्रभू श्रीराम! पाहा ११ वर्षांच्या या मुलाची अद्भुत कला…

नवरीने अतिशय सुंदर साडी नेसली होती. गळ्यात सोन्याचे दागिने, केसांची आकर्षक केशरचना करून दिमाखात नवरी मेट्रोमधून प्रवास करत आहे, असे व्हिडीओमध्ये पाहता येते. शेवटी इतका सगळा खटाटोप करून, नवरी मुलगी आणि तिच्याबरोबरची मंडळी बरोबर मुहूर्ताआधी लग्नाच्या हॉलवर पोहोचली असल्याचे व्हिडीओमधील कॅप्शनमधून दिसते.

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमाद्वारे @ForeverBLRU या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीदेखील नवरीने दाखवलेल्या हुशारीचे कौतुक करून भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या पाहू.

“नशीब मेट्रो होती, मेट्रोचे आभार मानायला हवे, पण ती नसतीच तर?” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने “बाई, किती गोड.” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “धाडसी आणि चतुर नवरी आहे ही” असे लिहिले आहे. तर व्हिडीओ शेअर करून त्याखाली “भन्नाट! बंगळुरू ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या हुशार नवरीने स्वतःची गाडी सोडून मेट्रोच्या मदतीने लग्नाच्या मुहूर्ताआधी पोहोचली. @peakbengaluru moment” असे कॅप्शन लिहिलेले आहे.

Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर आतापर्यंत २०.९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.