Shocking video: मानवाने जंगलांमध्ये अतिक्रमण केले आहे. यामुळे आता जंगलांमध्ये भक्ष्य राहिले नाहीत. मग भुकेमुळे अनेक प्राणी गावाकडे धाव घेतात. बिबट्यासारखे प्राणी अनेकवेळा गावात घुसल्याची उदाहरणे आहेत. यामुळे गावातील पाळीव प्राणी किंवा मानवावर बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. यावेळी एखाद्या भागात बिबट्या दिसल्यावर त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जातो. मात्र, अनेकदा बिबट्या सहजासहजी सापडत नाही. दरम्यान बिहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये काही लोकांनी बिबट्याला अशा पद्धतीने पकडलं की पाहून तुम्हालाही संताप येईल.

बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. अशाच एका बिबट्याचा रत्नागिरीतला व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ऐरवी बिबट्याला बघूनही घाम फुटतो मात्र याठकाणी चार जणांनी बिबट्याचे चार पाय आणि एकानं तोंड पकडलं आहे. एवढ्या ताकदवान प्राण्याला अशाप्रकारे पकडणे धोकादायक आहे. दरम्यान एवढंच नाहीतर या लोकांनी ज्या प्रकारे बिबट्याला पकडलं त्यामध्ये तो आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण लोकांनी बिबट्याचा अक्षरश: गळा पकडला आहे. या व्हिडीओमध्ये तो स्वत:च्या सुटकेसाठी डरकाळीही फोडताना दिसत आहे.काही सेंकदाचा हा थरार अंगावर शहारे आणणार आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! “बोल मै हलगी बजावू क्या” गाण्यावर हळदीला केला भन्नाट डान्स; VIDEO एकदा पाहाच

@Chahat137 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला जवळपास २ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एकानं म्हंटलंय “या माणसांसमोर बिबट्या भोळा दिसतोय.” तर आणखी एकानं “बिहारी लोकांचा स्वॅग” तर काहींनी यावर टीकाही केली आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये युजरने “हे फक्त बिहारमध्येच होऊ शकतं” असं लिहलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.