परफ्युमचे अनेक प्रकार आपण आजवर ऐकले असतील. विशेषतः पार्टनरला आकर्षित करण्यासाठी तर बाजारात नानाविध प्रकारचे रोमँटिक मूड बनवणारे परफ्युम उपलब्ध आहेत. याउलट अनेकांना निरनिराळ्या सुगंधाचं भारी वेड असतं. काहींना तर अगदी विचित्र वास जसे की पेट्रोलचा गंध, नेलपॉलिशचा गंध हे सुद्धा आवडतात पण अलीकडे सोशल मीडियावर एका भलत्याच पर्फ्युमची भारी चर्चा रंगलीये. हा परफ्युम म्हणजे व्हॅबिंग, ‘व्हजायना’ आणि ‘डॅबिंग’ या शब्दांना जोडून ही संकल्पना तयार झाली आहे. आपल्या स्वत: च्या योनीतून निघणारा स्राव परफ्यूम म्हणून वापरण्याच्या पद्धतीला व्हॅबिंग असे म्हंटले जाते.

वास्तविक ज्युलिया नावाच्या एका टिक टॉकरने अलीकडेच असा दावा केला की व्हॅबिंगमुळे तिला अनेक बार मध्ये फ्री ड्रिंक्स ऑफर करण्यात आली होती आणि तिला पूलमध्ये भेटलेल्या अनेक मुलांकडून महागडी गिफ्ट्स देण्यात आली. इथूनच हा एकूण ट्रेंड सुरु झाला असावा, यानंतर फक्त ज्युलिया ने नव्हे तर इतर अनेक महिलांनी असेच दावे केले आहेत. एका महिलेने दावा केला आहे की डेटवर असतानाही इतर पुरुष तिच्याकडे बघत राहायचे.

महिलेने Condom ला सुईने पाडलं छिद्र, पार्टनरने गाठली थेट कोर्टाची पायरी..काय घडलं पहा

TikTok वर, #vabbing ने जवळपास 682,000 व्ह्यूज मिळवले आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांच्या व्हिडीओ क्लिप्स आहेत. टिकटॉकर मॅंडी ली हिच्या व्हॅब व्हिडीओला तर 1.4 कोटी व्ह्यूज आहेत, या व्हिडीओ मध्ये कोणत्याही कायद्यात व्हॅबिंगचा समावेश केला नसल्यामुळे इतर महिलांना शिकवण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचं म्हंटलं आहे. व्हॅब दरम्यान कानांच्या मागे, मनगटावर आणि मानेवरची हा परफ्युम लावण्याचा सल्ला दिला जातो.

धक्कादायक! टॉयलेट मधून बाहेर आला किंग कोबरा, व्यक्तीच्या गुप्तांगाचा घेतला चावा.. पुढे काय घडले पहा

या एकूण प्रकरणाबाबत त्वचातज्ज्ञ डॉ. ब्लेअर मर्फी-रोझ सांगतात,की योनीमार्गातील द्रवांमध्ये फेरोमोन असतात, जे लैंगिक संबंधासाठी उत्तेजित करतात. लैंगिक संबंधात गंध, सुवास महत्त्वपूर्ण कामगिरी करतात. आपल्या पार्टनर्सना आकर्षित करून घेण्यासाठी अनेक प्राणी सुद्धा या पद्धतीचा वापर करतात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल ट्रेंड बद्दल आपल्याला काय वाटते? खरोखरच भविष्यात अशा प्रकारचे परफ्युम बाजारात आले तर त्यावर आश्चर्य वाटायला नको इतकं खरं..