Viral video: सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. अशातच तुम्ही आतापर्यंत तरुणांना चालत्या बाईकवर स्टंटबाजी करताना पाहिलं असेल मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की डोक्याला हा लावाल. कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या बाईकवर चक्क हात सोडून स्टंटबाजी करतोय. त्यानं भरदाव पळणाऱ्या बाईकवर असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती बिनधास्त दुचाकीवर स्टंटबाजी करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने हेल्मेट घातले आहे. आणि तो हायवेवर ओला इलेक्ट्रिक स्कूटर चालवत आहे. येथे आश्चर्याची बाब म्हणजे ती व्यक्ती हँडल न धरता स्कूटर चालवत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ती व्यक्ती स्कूटरवर हात धरून आरामात बसलेली आहे. हायवेवर स्कूटर भरधाव वेगाने धावत आहे. स्कूटरच्या आजूबाजूला इतर अनेक वाहने आहेत, जी हायवेवर भरधाव वेगाने धावत आहेत. त्या व्यक्तीची स्कूटर चालवण्याची शैली पाहून त्याच्याजवळून जाणाऱ्या वाहनांमध्ये उपस्थित असलेले लोकही घाबरले. थोडाजरी तोल गेला तरी मोठा अपघात होऊ शकतो.

हा व्हिडीओ २६ सेकंदाचा असून यामध्ये या व्यक्तीनं एकदाही स्कूटीच्या हँडलला हात लावलेा नाही. २६ सेंकदात हा व्हिडीओ संपल्यामुळे पुढे नक्की काय झालं याची माहिती मिळालेली नाही. मात्र हे अतिशय धोकादायक आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चमत्कार की योगायोग? अपघातानंतर पुढच्या ५ मिनिटांत काय झालं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @DoctorAjayita या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.