पाळीव प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमींसाठी तर हे व्हिडीओ पाहणे म्हणजे दिवसभरातील ताण घालवण्याचा उपाय. अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी असतात, त्यांच्यावर त्या घरातील व्यक्ती जितकं प्रेम करतात, तितकच प्रेम हे पाळीव प्राणी देखील त्यांच्यावर करतात. घरातील इतर सदस्यांप्रमाणे ते देखील हक्काने रागावताना, चिडताना दिसतात. त्यांच्या गोंडस कृतींचे, हावभावांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधल्या मांजरीची प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
या व्हिडीओमध्ये एक मांजर घरात आरामात बसलेली दिसत आहे. तेव्हा त्या घरातील महिला या मांजरीला आज जेवण उशीरा मिळणार असल्याचे सांगतात, तेव्हा ही मांजर अचंबित होऊन याला विरोध दर्शवते. विरोध दर्शवताना ती काढणारा आवाज अगदी ‘नो’ (नाही) म्हटल्याप्रमाणे वाटतो, यावर मांजर देखील आपल्यासारखीच प्रतिक्रिया देत असल्याचा भास होतो. पाहा मांजरीची भन्नाट प्रतिक्रिया.
आणखी वाचा : मंत्र्याचा दिलदारपणा; शेकडो गरीब मुलांना घडवली मॉलची सैर, दिली हवं ते खरेदी करण्याची मुभा
व्हायरल व्हिडीओ :
नेटकऱ्यांना मांजरीच्या प्रतिक्रियेचा हा गोंडस व्हिडीओ आवडला असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.