Video: पेट्रोल भरण्यासाठी केलेली घाई पडली महागात; बाइकचा तोल गेला अन्… | Petrol pump viral video man loses control over bike watch what happens next | Loksatta

Video: पेट्रोल भरण्यासाठी केलेली घाई पडली महागात; बाइकवरील नियंत्रण सुटले अन्…

पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले आहे

Petrol pump viral video man loses control over bike watch what happens next
पेट्रोल पंपावरील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

अति घाई संकटात नेई! हा वाक्यप्रचार तुम्ही ऐकला असेल. कोणतेही काम करताना जर आपण घाई केली तर कधीकधी ते काम काम लवकर पूर्ण होण्याएवजी वेगळेच काही संकट उभे राहते. त्यामुळे घाई न करता शांतपणे इतर गोष्टींची काळजी घेत एखादे काम करण्याचा सल्ला दिला जातो. पण काहीजणांना प्रत्येक गोष्टीची इतकी घाई असते की त्यांच्याकडे थोडाही संयम नसतो. असाच एका संयम नसलेल्या एका व्यक्तीवर ओढावलेले संकट सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काहीजण पेट्रोल पंपावर बाइक घेऊन रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. पण त्यांच्यामध्ये सर्वात आधी पेट्रोल मिळावे याची चढाओढ सुरू होते. त्यातला एक माणूस इतरांना मागे टाकत गाडी इतक्या वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो की त्याचा गाडीवरचा तोल सुटतो आणि बाइक वर जाऊन आदळते. यात मागे बसलेल्या वयस्कर व्यक्ती जोरात खाली पडलेली दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. गाडी चालवण्याच्या विषयावरुन महिलांना कमी लेखणारे पुरुषदेखील गाडीबाबत किती शुल्लक चुका करतात, अशा कमेंट्स काही जणांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 19:46 IST
Next Story
कर्मचाऱ्याला नोकरीवर असताना ‘बोर’ होण्याचा मिळाला अधिकार, काय आहे प्रकरण? जाणून घ्या