Pet’s Skincare: बदलत्या वातावरणाचा प्रभाव जसा आपल्या शरीरावर होतो, त्याचप्रमाणे तो कुत्र्यांसारख्या पाळीव प्राण्यांवरदेखील होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये घरी पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या लाडक्या मित्रांसाठी त्यांचे मालक खूपकाही करत असतात. माणसांप्रमाणे, कुत्र्यांची त्वचा देखील संवेदनशील असते. त्यांनाही स्कीनकेअरची गरज असते. फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे जाणवत आहे. या कालावधीत त्यांची त्वचा कोरडी होणे सहाजिक असते. काही वेळेस वातावरणातील बदलांमुळे अ‍ॅलर्जी झाल्याने त्यांना खाज सुटू शकते. अशा वेळी त्यांची नीट काळजी घेणे आवश्यक असते.

सुपरटेल्स.कॉमचे मुख्य पशुवैद्य डॉ. शंतनू कळंबी म्हणतात, “जसजसा उन्हाळा सुरु होत जातो, तसतसे हवामानात बदल होत जातात. अशात बदलणाऱ्या हवामानामुळे कुत्र्यांच्या शरीरावर परिणाम होतो. या काळामध्ये त्यांची निगा राखणे आवश्यक असते.” डॉ. शंतनू यांनी या ठराविक काळासाठीच्या पाळीव प्राण्यांच्या स्कीनकेअर रुटीनची माहिती देखील दिली आहे.

१. नियमितपणे ग्रूमिंग करणे.

उन्हाळा सुरु होत असताना शेडिंगचे प्रमाण वाढत जाते. अशात त्यांच्या फरावरचे काही केस गळू लागतात. यामुळे त्यामध्ये गुंता होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी फरवरुन नियमितपणे ब्रश फिरवणे आवश्यक असते. असे केल्याने त्वचेसंबंधित आजार टाळले जातात. तसेच त्याने रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेचा वेग वाढत जातो. परिणामी त्यांचे स्वास्थ सुधारते.

२. पिसू आणि गोचीड यांच्यापासून त्यांचे रक्षण करणे.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये पाळीव प्राण्यांमध्ये पिसू आणि गोचीड यांचा त्रास वाढायला लागतो. त्यांच्या शरीराची स्वच्छता राखून या समस्येवर मात करता येते. हा त्रास होत असल्यास पशुवैद्याचा सल्ला घेऊन उपचार करणे फायदेशीर ठरु शकते.

Kohinoor: वादविवाद कार्यक्रमादरम्यान महिला पत्रकाराने मांडली भारतीयांची बाजू, म्हणाली, “कोहिनूर आम्हाला…”

३. अ‍ॅलर्जी ओळखून त्यावर उपाय करणे.

वाढत्या उष्णतेमुळे त्वचेला हानी होऊ शकते. कुत्र्यांनादेखील या त्रासाला सामोरे जावे लागते. जर तुमच्या कुत्र्याला खाज सुटत असेल, तो स्वत:ला गरजेपेक्षा जास्त चाटत असेल किंवा त्याच्या शरीरावर रॅशेस दिसत असतील, तर लगेच त्याला पशुवैद्याकडे घेऊन जा. त्यांच्या सल्लानुसार उपचार करा.

४. सूर्य प्रकाशामध्ये जास्त वेळ फिरवू नका.

उन्हाळा सुरु झाल्यानंतर सूर्य प्रकाशापासून पाळीव प्राण्यांचे रक्षण करणे आवश्यक असते. त्यांना सनबर्न होण्याची शक्यता असते. त्यात गडद रंगाची त्वचा असलेल्या प्राण्यांना जास्त धोका संभवतो. अशा वेळी बाहेर फिरायला नेताना त्यांना सनस्क्रीन लावावे किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर त्यांना घराबाहेर घेऊन जावे.

५. शरीराची स्वच्छता राखा.

कुत्र्यांच्या शरीराची निगा राखण्यासाठी त्यांनी नियमितपणे अंघोळ घालावी. महिन्यातील ठराविक दिवशी त्यांना अंघोळ घालू शकता. अंघोळीचे प्रमाण वाढल्यास त्वचेमधील विशिष्ट पदार्थ निघून जातात आणि त्वचा कोरडी होते. चार ते सहा आठवड्यांमधून एकदा त्यांना अंघोळ घालणे योग्य मानले जाते. याबाबत तुम्ही पशुवैद्याशी चर्चा करु शकता.

बिबट्याच्या हल्ल्याने वाघ पिसाळला, झेप घेतली तेवढ्यात वजन.. जंगलातील थरारक Video पाहून थक्कच व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. आहाराकडे लक्ष द्या.

पाळीव प्राण्यांना नेहमी स्वच्छ, ताजे पाणी प्यायला द्यावे. त्यांचे पाणी पिण्याचे भांडे साफ असणे आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाकू शकता. प्राण्यांना दिले जाणारे जेवण द्रव्य स्वरुपामध्ये असावे जेणेकरुन ते पचायला सोपे जाईल. तसेच त्यांना हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी असल्याने त्वचेला फायदा होतो.