अवघ्या काही फुटांवर होता मृत्यू

मुलाशेजारी घिरट्या घालणारी शार्क कॅमेरात कैद

(छाया सौजन्य : Chris Hasson via AP)

बरेचदा आपल्या डोळ्यांनी जे दिसत नाही असे काही प्रसंग कॅमेरात कैद होतात. असाच काहिसा प्रकार झाला तो बाप लेकासोबत. आपला १० वर्षांचा मुलगा समुद्रात सर्फिंग करत आहे याचे बाबांना भारीच कौतुक होते. त्यामुळे आपल्या कॅमेरात मुलाचे शक्य असतील तेवढे फोटो ते कैद करत होते. पण त्याचे  फोटो पाहताना त्यांनी जे काही पाहिले ते बघून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली कारण या चिमुरड्या सर्फरच्या बाजूंनी चक्क आठ फूटांची शार्क घिरट्या घालत होती.

VIDEO : १८ सिंहांच्या ‘शाही भोजना’ने रस्त्यात झाली वाहतूक कोंडी

दहा वर्षांचा इडन आपल्या वडिलांसोबत ऑस्ट्रेलियाच्या सॅमुराय किना-यावर सर्फिंग करण्यासाठी गेला होता. लाटांशी योग्य सुर जुळवत तो सर्फिंग करत होता. त्याचे बाबाही मुलाचे कौतुकाने फोटो घेत होते. पण जेव्हा मुलाचे फोटो कसे आलेत हे पाहण्यासाठी त्यांनी कॅमेरा पाहिला तेव्हा त्यांना काहीतरी विचित्र दिसले. जेव्हा झूम करून त्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या मुलाशेजारी चक्क आठ फुटांचा शार्क मासा घिरट्या घालत आहे. हे पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. कारण शार्क हा अत्यंत धोकादायक मासा आहे. पण त्याचबरोबर माणसांवर हल्ले करण्याच्या अनेक घटनाही आहेत. अनेकदा शार्कच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यूही होतो. पण क्रिस यांनी प्रसंगावधानता दाखवत आपल्या मुलाला किना-यावर बोलावून घेतले. सुदैवाने या माशाने तोपर्यंत हल्ला केला नाही. हा फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाला. या भागात गेल्या काही दिवसांपासून शार्कच्या संख्येत वाढ झाली आहे तसेच शार्क हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहे त्यातून या फोटोने चांगलीच दहशत पसरवली आहे.

VIDEO : एकमेकांपासून दुरावलेल्या आई आणि पिलांची अनोखी भेट!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Photo bombing shark that shared a wave with 10 year old surfer

ताज्या बातम्या