साप पाहिल्यानंतर अनेकदा लोक घाबरतात. मोठा साप पाहताच लोक इकडे तिकडे धावू लागतात. अनेक वेळा साप घरात लपून बसतो आणि संधी मिळताच चावतो. त्यामुळेच अनेकदा जुन्या वस्तूंना हात न लावण्याचा सल्ला दिला जातो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही घाबरून जाल. या व्हिडीओमध्ये साप कोणत्याही वस्तूच्या आत नसून एका व्यक्तीच्या कपड्यांमध्ये घुसला आहे. सापाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक विषारी साप त्या माणसाच्या शर्टमध्ये घुसला आहे,व्हिडिओमध्ये ती व्यक्ती घाबरलेली दिसत असून काही लोक त्या व्यक्तीला मदत करत आहेत.. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, साप त्याच्या शर्टच्या दोन बटणांमधून डोके बाहेर काढतो आणि नंतर आत शिरतो. तेथे उपस्थित काही लोक त्या व्यक्तीला हलवण्यास नकार देत आहेत, त्यानंतर ती व्यक्ती घाबरून आपले दोन्ही हात हवेत उंचावून साप बाहेर येण्याची वाट पाहत आहे. जेव्हा साप बाहेर पडत नाही तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकजण त्याच्या मदतीसाठी पुढे येतो आणि त्याच्या शर्टचे बटण काढू लागतो. यानंतर हळूहळू साप त्याच्या शर्टमधून बाहेर येतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाजिममध्ये व्यायाम करताना तरुणाच्या तोंडावर पडला २० किलोचा डंबल; CCTV VIDEO मध्ये समोर आलं वेगळंच सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही व्यक्ती जमिनीवर बसलेली आहे. व्हिडिओमध्ये हा साप खूपच धोकादायक दिसत आहे. एका यूजरने या व्हिडिओवर लिहिले की, ‘हे खूप धोकादायक होते’. विषारी सापांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातही झाले आहेत. अनेकवेळा सापाला उचलून स्टंट करतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.