जापानमधील आवडता स्नॅकलाही महागाईची झळ बसली आहे. चार दशकांहून अधिक काळ लोकांच्या मनावर राज्य केलेला आवडता खाऊ महाग झाला आहे. गेली ४३ वर्षे जापानमधील Umaibe कॉर्न पफच्या किंमत १० येन रुपये होती. मात्र आता याची दोन येनने वाढवण्यात आली असून १२ येन झाली आहे. १९७९ पासून कॉर्न पफ स्नॅक Umaibo किंमत आहे तशीच होती. मात्र आता कंपनीने किंमत वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. खर्च जास्त असल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

उमाईबो एक ‘डिलिशिअस स्टिक’ म्हणून जापानमध्ये प्रसिद्ध आहे. लॉलिपॉपसारखा दिसणारा हा खाद्यपदार्थ आहे. त्याचा आकार सिलेंडरसारखा आहे. १५ फ्लेवर्समध्ये ही स्टीक मिळते. दरवर्षी ७०० दशलक्ष स्टिक विकल्या जातात. मागणी कमी होण्याच्या भीतीने गेली काही वर्षे निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र अखेर किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “स्वस्त स्नॅकवर असा परिणाम होईल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती. हा खाऊ मुलं सहज खरेदी करू शकत होती. या निर्णयामुळे मी दुःखी आणि आश्चर्यचकीत झालो आहे”, असं मत एका ग्राहकाने व्यक्त केलं. तर ५१ वर्षीय गृहिणी नाओमी होसाका यांनी सांगितलं की, “स्वस्त स्नॅक्सवर म्हणजेच अगदी लहान मुलांना विकत घेऊ शकणार्‍या गोष्टींवरही याचा परिणाम जाणवत आहे, हे थोडे दु:खद आहे.”

Viral News: जगातील सर्वात लांब नाव असलेल्या जागेची सोशल मीडियावर चर्चा; वाचता वाचता अनेकांची वळाली बोबडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणाचे साक्षीदार आहोत,” रॉक संगीतकार अत्सुशी ओसावा यांनी ट्विटरवर सांगितले. त्याच्या बँड, उचिकुबी गोकुमोन डौकौकाईने २०१० च्या एका गाण्यात स्नॅकबाबत गौरवोद्गार काढले होते. या गाण्यात उमाइबोच्या “चमत्कारीक किंमत” बद्दलचे बोल होते. मात्र किंमत वाढल्याने अत्सुशी ओसावा हे नाराज झाले आहेत.” किंमत गाण्यांपासून भिन्न होऊ लागली आहे,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.