पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचं निसर्गाप्रति असलेलं प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. भाषणात किंवा मुलाखतीत त्यांनी याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. पक्षीप्रेमाचा असाच एक व्हिडीओ मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मोदी यांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर मोराचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात मोदींच्या निवासस्थानी मोर आल्याचं दिसत आहे. निवास्थानी आलेल्या या खास पाहुण्यांची मोदी यांनी काळजी घेतली. या मोरांना मोदी दाणे टाकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसणारा मोर याआधीही पंतप्रधानांच्या घरासमोरील बागेत दिसला आहे.

मोदी यांनी हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पोस्ट केला आहे. मोदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत मोदींना दाद दिली आहे.