आपल्या आजूबाजूला, रस्त्यावर असे कितीतरी लोक उपाशीपोटी झोपतात किंवा त्यांना एकवेळचं अन्नही मिळत नाही. रात्री झोपडीत एक लाइटचा बल्बही त्यांच्या नशिबात नसतो. आपल्याला ही परिस्थिती समजत असते पण याकडे आपण कानाडोळा करतो आणि निघून जातो. पण या जगात असेही काही लोक आहे जे खरंच त्यांची काळजी करतात. सध्या सोशल मीडियावर अनेकांची मने या मुलीने जिंकून घेतली आहेत. या मुलीने गरिबाच्या झोपडीत प्रकाश आणला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजेचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. ज्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांना विजेचे दर परवडणं अशक्य आहे. याचाच विचार करुन समाजसेवक खुशी पांडे यांनी पुढाकार घेतला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या भागातील कीटक आणि सापापासून वाचवण्यासाठी त्यांनी सौर दिवे दिले आहोत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा होता. अंधारमय झोपडी प्रकाशाने उजळेली पाहून गरीबांची दिवाळीच साजरी झाल्यासारखं वाटत होत. खुशी पांडे यांनी दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Gym accident Video: मुलींना इंप्रेस करण्याचा नाद आला अंगलट! जिममध्ये मरता मरता वाचला तरुण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यामध्ये काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ रडवणारे असतात. आजकाल सोशल मीडियावर नवनव्या गोष्टी ट्रेंड होतात. त्यामुळे रोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असलेल्या पहायला मिळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडीओ पहायला मिळतात. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.