पुण्यात ढोल-ताशा वादनाला अत्यंत महत्त्व आहे. पुणेकरांना ढोल ताशाचं वादन करायला आणि ऐकायला दोन्ही आवडते. गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशाशिवाय मानाच्या गणपतीची मिरवणूक कधीही निघत नाही. गणेशोत्सवादरम्यान ढोल-पथकांचे वादन पाहायला लोक लांबून लांबून येतात. पण पुण्यात नुकत्याच झालेल्या पावसाने ढोल-ताशा पथकांचे मोठे नुकसान केले आहे. सोशल मीडियावर सध्या ढोल ताशा पथकांचे ढोल पाण्यात वाहून जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे जे पाहून नेटकऱ्यांचा डोळ्यात अश्रू दाटले आहेत.

गणेशोत्सवापूर्वीच काही महिन्यांपासून पुण्यातील ढोल-ताशा पथकांची रंगीत तालीम सुरु होते. अनेक नवीन वादक पथकात सामील होतात. दररोज ठरलेल्या वेळेत वादनाचा तालीम घेतली जाते. पुण्यातील अनेक मंडळे नदीपात्रामध्ये ढोल-ताशा वादनाचा सराव करताना दिसतात त्यामुळे अनेकांनी नदीपात्राच्या परिसरातच पत्र्याचे शेड उभारून ढोल ताशा ठेवण्यासाठी जागा तयार केली आहे. पण मुसळधारपावसाने नदीपात्रात उभारलेल्या या पत्र्याचे शेडमध्येही पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की पत्र्याचे शेडही कोसळले आण त्याबरोबर ढोल-ताशा देखील वाहून गेले आहेत. नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या ढोलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

ढोल-ताशा पथकांना पुण्यात आलेल्या पुराचा चांगलाच फटका बसला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक ढोल-ताशा वादकांच्या आणि पुणेकरांच्या डोळ्यात अश्रू आले.

इंस्टाग्रामवर pcmc_kar आणि kothrudkarpune नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “आज पाण्यात ढोल वाहून जात होते. याच दुःख एक वादकच समजू शकतो! गणपती बाप्पा तुम्हीच काळजी घ्या सगळयांची!”

हेही वाचा – “मित्रा, जीव वाचव, परत ये”,पुराच्या पाण्यात गाडी घेऊन गेला तरुण, मित्र ओरडत राहिला पण त्याने ऐकले नाही, पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी दुख व्यक्त केले. एकाने कमेंट करून लिहिले, माझ्या बाप्पााने काळजी घेतली आणि ढोल सुखरुप मिळाले.
दुसरा म्हणाला, “अरे असं का नाही समजत तुम्ही ज्या पाण्यात बाप्पा च विसर्जन केल तिथेच ढोल बाप्पाना आणायला चालले आहे.”
काहींनी खोचक टिका करत म्हटले की, “बाप्पा सांगत आहे की, चामडं बडवून ध्वनी प्रदुषण करु नको. अभ्यास कर. मोठा हो. समाजाच्या हिताची कामे कर.”
दुसरा म्हणाला की, “ह्याचा एक अर्थ असाही असु शकतो की २ महिने सर्वत्र चालणारे ध्वनिप्रदूषण बाप्पालाही मान्य नसावे. ढोल पथकांची संख्या अमर्यादित झालेली आहे.”