Pune viral video: लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांना लहानपणापासून शिस्त लावणे, स्ववलंबी बनवणे कृतज्ञता व्यक्त करायला लावणे, आणि प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन व मन लावून करायला शिकवणे महत्त्वाचे आहे. तसेच, त्यांच्यामध्ये चांगली वागणूक, चारित्र्य आणि नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी पालकांनी स्वतः एक आदर्श म्हणून वागणे आवश्यक आहे. लहानपणापासून मुलांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं. वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाही तर त्यांच्या मनावरही चुकीचा परिणाम होतो. दरम्यान सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, अशातच पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतला एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लाहन मुलं जे करत आहेत ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

‘जशी संगत असते तशीच चारित्र्य असते’. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या प्रकारच्या लोकांसोबत वेळ घालवता, त्यांचे विचार, वर्तन आणि सवयी हळूहळू तुमच्यात येऊ लागतात. मुलांमध्ये हा परिणाम आणखी जलद होतो, कारण यावेळी ते भावनिकदृष्ट्या नाजूक असतात आणि इतर लोकांचा त्यांच्यावर सहज प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत, जर मुले वाईट संगतीत पडली तर त्याचा त्यांच्या वर्तनावर, आत्मविश्वासावर, अभ्यासावर आणि त्यांच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, तुमचे मूल चुकीच्या संगतीत पडले आहे की नाही हे पालकांनी वेळीच समजून घेणे आणि ओळखणे खूप महत्वाचे आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विसर्जन मिरवणुकीत अक्षरश: गणपती बाप्पाच्या मुर्तीच्या शेजारी उभं राहून ही १०, १२ वर्षाची मुलं एकमेकांना अश्लिल पद्धतीनं चिडवत आहेत. एवढ्याश्या वयात अशाप्रकारची वागणूक पाहून सर्वच शॉक झाले आहेत. हे पाहून या मुलांचं भविष्य किती धोक्यात आहे हे लक्षात येतंय. त्यामुळे पालकांनी वेळीच आपल्या मुलांवर लक्ष देणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ

आजच्या व्यग्र जीवनशैलीत मुले त्यांच्या पालकांसोबत कमी वेळ असतात. त्याचबरोबर ऑफिस आणि घरातील कामांचा समतोल साधण्यासाठी पालकही मुलांना पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे काही वेळा मुलं चुकीच्या संगतीत पडून बिघडू लागतात. याचंच हे मोठं उदाहरण आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pcmc_chya_karamati नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून नेटकरीही यावर टीका करत आहेत.