Puneri Patya In Pune Metro : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख सांगतात. पुण्याच्या अनेक गोष्टी नेहमी चर्चेत असतात. ऐतिहासिक ठिकाणे, गडकिल्ले, पुणेरी भाषा, खाद्यपदार्थ एवढंच काय तर पुणेरी पाट्या. पुण्याला पुणेरी पाट्यांचा खूप मोठा इतिहास लाभला आहे. पुण्यातल्या पाट्या या पुणेरी लोकांची मार्मिक टिप्पणी असते. खोचक शब्दात कधी टिका करतात तर कधी चांगला संदेश देतात. पुणेरी पाट्या पुणेकरांनी तयार केलेल्या विनोदी किंवा मार्मिक सूचना दर्शवणारे फलक आहे. या पाट्यांद्वारे पुणेकर कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थपूर्ण बोलून जातात. पाट्यांद्वारे पुणेकर किमान शब्दात कमाल अपमान करतात, अशी टिका अनेकदा केली जाते पण अनेकदा याच पाट्यांद्वारे चांगले संदेश सुद्धा दिले जाते.

पुणे मेट्रोत पुणेरी पाट्या लागल्या, प्रवासी बघतच राहिले..

सध्या पुणे मेट्रोने या पाट्यांचा वापर करून सुचना फलक लावलेले आहे आणि पुणेरी बाणा जपत पुणे मेट्रोने पुणेरी भाषेत प्रवाशांना सुचना दिल्या आहेत. आजवर तुम्ही शहरात अनेक पुणेरी पाट्या पाहिल्या असतील पण मेट्रो स्टेशनवरील पुणेरी ‘मेट्रो पाटी’पाहिली आहे का? हो, पुणे मेट्रोने त्याच्या अधिकृत अकाउंटवरून मेट्रो पाटीचे फोटो शेअर केले आहेत. आज आपण या पाट्याविषयी जाणून घेऊ या.

metrorailpune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेट्रो स्टेशनवरील तीन पुणेरी पाट्यांचे फोटो शेअर केले आहेत.

१. थांबा!

मेट्रो सुटली असेल तर उगाच पळापळ करू नका
मेट्रो सुटली तरी जग थांबत नाही.
पुढची येणारच आहे.

२. ऐका!

उगाच मोठ्याने गाणी लावून
संगीतप्रेम दाखवू नका,
पुण्यात सगळेच दर्दी आहेत.
हेडफोन्स वापरा.

३. सूचना!

दरवाजे ऑटोमॅटिक आहेत.
शक्ति प्रदर्शन केल्याने उघड बंद होणार नाहीत.

पाहा फोटो (Watch Viral Photo )

या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कसा वाटला पुणेरी ‘मेट्रो पाटी’चा बाणा?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जर शेवटची मेट्रो असली तर पळापळ करायची?” तर एका युजरने लिहिलेय, “route वाढवा आधी. टोमणे नंतर मारा” काही युजर्सनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.