Pune Rain Updates video: पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पु्ण्या्च्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागांत मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याच पुलावर पांढऱ्या रंगाची एक कार अडकून पडली आहे. याचा धडकी भरणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यात टिळक पूल पाण्याखाली

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, टिळक पूल पूर्णत: पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. या पुलावरची वाहतूकही पूर्णपणे थांबवण्यात आली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मात्र एवढ्या पाण्याच्या प्रवाहात टिळक पुलावर मात्र एक पांढऱ्या रंगाची कार थांबवलेली दिसत आहे. या कारमध्ये प्रवासी आहे की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अशाप्रकारे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पुलावर मधोमध कार अडकल्याचं पाहून चिंता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात ३२ वर्षातील सर्वाधिक पाऊस

पुण्यात गेल्या ३२ वर्षांमध्ये इतका पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलीय. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासात तब्बल ५५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले असून लोणावळा, शिरगाव, कोयना परिसरात तुफान पाऊस झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: निसर्गातील एक चूक अन् खेळ खल्लास! डोंगराच्या कड्यावर अडकले तीन मित्र; शेवट पाहून थरकाप उडेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.