Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराचा इतिहास सांगतात. येथील प्राचीन मंदिरे, येथील ऐतिहासिक वास्तू या शहराची ओळख आहे. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत, जे बघण्यासाठी दुरवरून लोक येतात. पण पुण्यातील असे काही सुंदर ठिकाणे आहेत, ज्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एक सुंदर शिव मंदिर सांगितले आहे. हे मंदिर इतके सुंदर आहे की व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा येथे एकदा भेट द्यावीशी वाटेल. या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर गुहा दिसेल. या गुहेमध्ये सुंदर लाइटिंग लावली आहे. या व्हिडीओ तुम्हाला सुरूवातीला नंदी दिसेल त्यानंतर या गुहेतून जाताना काही पायऱ्या आहेत आणि पायऱ्या उतरल्यानंतर सुंदर शिवलिंग दिसेल. हे शिवलिंग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही गुहा अत्यंत सुंदर दिसत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर नेमके आहे तरी कुठे? तर हे मंदिर हडपसरमध्ये अमनोरा मॉल च्या समोर मगरपट्टा परिसरात आहे. रुद्रेश्वर मंदिर या नावाने हे मंदिर ओळखले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

punewatavaran या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेला आहात का पुण्यातील या सुंदर शिव मंदिरात?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हर हर महादेव” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यात राहून पुण्यतील स्थळ फिरू नाही शकलो नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “जय महाकाल.. ओम नम: शिवाय” आणखी एका युजरने लिहिलेय, “हर हर महादेव” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर लोकेशन विचारले आहे तर काही युजर्सनी यावर उत्तर देत लोकेशन सुद्धा सांगितले आहे. जवळपास दोन लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
पुण्यातील असे अनेक मंदिराचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक यावर भरभरून प्रतिसाद देतात.