Pune Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात एसटीचे कर्मचारी लालपरी दुरुस्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक थक्क होईल.

लाल परी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण दररोज एसटीने प्रवास करतात. शाळेतील मुलांपासून नोकरीला जाणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येक जण एसटीचा वापर करतात. राज्यातील हजारो लोक दररोज एसटीने ये जा करतात. एक दिवस जरी एसटीचे वेळापत्रक कोलमडलं, तरी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सध्या एसटीतील काही जुन्या बसेसची अवस्था खूप बिकट आहे. अनेक बसेसची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे दिसून आले. अनेक बस जुन्या झाल्यामुळे त्यांचे भाग खराब झाले आहेत. अनेकदा अर्ध्या रस्त्यात बसेस बंद पडतात. अशावेळी प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले जाते. एसटीच्या जुन्या बसेसची अवस्था सुधारण्यासाठी नियमित देखभाल आणि दुरुस्ती आवश्यक आहे. तसेच काही बसेस बदलण्याची आणि नवीन बसेस खरेदी करण्याची गरज आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला “एम एच १४ बी. टी. २०१५” नंबरप्लेट असलेली एसटी दिसेल. या लालपरीच्या भाग मोडलेला दिसत आहे. रात्रीच्या अंधारात दोन कर्मचारी हा भाग दुरुस्त करताना दिसत आहे. यावेळी काही कर्मचारी त्यांना टॉर्च दाखवत उभे आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला या कर्मचाऱ्याचे लालपरीविषयीचे प्रेम दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “जरी सरकारचे असेल तरी पण ते काही दिवसासाठी आपले समजून काम करणारे अशी लोक अजूनही समाजात आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

View this post on Instagram

A post shared by Crazy Aba (@crazyaaba)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

crazyaaba या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लाल परी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “म…. भाऊना सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “यांच्याकडून ठोकली असेल म्हणून बांधताय” आणखी एक युजरने लिहिलेय, “सलाम करा, आदर करा त्यांचा” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.