Viral Video : पुणे हे एक अतिशय लोकप्रिय शहर आहे. या शहरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्प्रे मारणारी एक गाडी दिसत आहे. सध्या पुण्याचं तापमान वाढल्याने गाडीद्वारे पाण्याचा स्प्रे मारत असल्याचे काही लोक गृहित धरत आहे. खरंच तापमान वाढल्याने शहरात पाण्याचा स्प्रे मारला जात आहे का, की तुम्हाला गैरसमज झाला आहे? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय होत आहे व्हायरल?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गाडी दिसेल. या गाडी महानगरपालिकेची आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही गाडी रस्त्याच्या एका बाजूला स्प्रे मारत पुढे जात आहे. काही लोकांना तापमान वाढल्याने पाण्याचा स्प्रे मारत असल्याचे वाटत आहे त्यामुळे सोशल मीडियावर पुण्यातील तापमानाचे उदाहरण देऊन हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एप्रिलमध्ये पुण्याचे तापमान ४० पर्यंत, मग मे महिन्यात पुण्याचे तापमान किती वर जाणार. पुणे एफसी रोड”
खरंच पुणे महानगरपालिका का स्प्रे मारत आहे?
या व्हिडीओमध्ये तुम्हाला जी गाडी दिसत आहे त्यावर लिहिलेय, “पुणे महानगरपालिका धुळ प्रदूषण नियंत्रण वाहन, पर्यावरण रक्षण, हेच खरे देशाचे संरक्षण” हे वाहन प्रदूषण नियंत्रणासाठी आहे, तापमान वाढल्याने पाण्याचा स्प्रे मारत असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पुणे महानगर पालिकेने प्रदुषण नियंत्रण ट्रक मागवले आहेत
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
puneri_shweta_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे एफसी रोड”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अजून झाडे कापा..” तर एका युजरने लिहिलेय, “हा काय प्रकार” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा काय प्रकार आहे?” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही मशीन आता पुण्यात सगळीकडे दिसतेय”