D Mart Viral Pati: पुणेरी पाट्या हा वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला विषय आहे. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेश देऊन जातात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण नियम म्हणजे नियम आणि याचे पालन केलेच पाहिजे, असा धडा शिकवून जाते.
पुणेरी पाट्यांचा जरा विशेष थाटच आहे. या पाट्या फक्त पुण्यातच नाहीतस तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेकऱ्यांच्या या पाटीचं कौतुक तर अनेक जण करतात; पण त्याच्यावर अनेकदा टीकाही होते. पण सध्या एक वेगळीच पाटी थेट डिमार्टमध्येही लावली आहे. ही पाटी सोशल मीडियावर व्हायरल होतेय जी पाहून डीमार्डला गेल्यावर नक्कीच ती गोष्ट करणं टाळाल.
व्हायरल व्हिडीओ (Puneri Pati D-Mart Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, डिमार्टमध्ये एक खास पाटी लावली आहे. जी वाचून काही जण नक्कीच रिलेट करू शकतील. या पाटीवर असं काही लिहिलंय की ज्याने सध्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलंय. या पाटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि अनेकजण कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत.
डिमार्टमधल्या या व्हायरल पाटीवर एक खोचक पण थेट अशी एक गोष्ट लिहिली आहे. कृपया साखर व शेंगदाणे खाऊ नये असं डिमार्टमधल्या एका पाटीवर लिहिलं आहे. साखर आणि शेंगदाणे सुटे व उघडे असतात त्यामुळे अनेकजण ते चाखण्यासाठी विकण्यासाठी ठेवलेली साखर आणि शेंगदाणे खातात.दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही. पण अनेकांनी हा व्हिडीओ पुण्याचा असल्याचं बोललं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @drive_trendy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसंव्चहिडीओला “फुकटचे साखर शेंगदाणे, अखेर डीमार्टला कळलेच” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला 419k व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अरे यार शास्त्र असत ते” तर दुसऱ्याने “एवढी मोठी कंपनी आणि असा बोर्ड, असं तर रेग्युलर किराणा मालाचा दुकानदार पण बोलत नाहीत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “यांच्यापेक्षा शेतकरी बरा, घ्या खा म्हणतो” तर एकाने “डीमार्ट काजू, बदाम कधी टेस्टिंगसाठी ठेवणार” अशी कमेंट केली. तर “बहुतेक डी मार्ट पुण्याचं आहे” अशीदेखील कमेंट एका युजरने केली.