Viral biodata: प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याला त्याच्या आवडीचा जोडीदार मिळावा आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्नही करतो. लग्नासाठी मुला आणि मुलीच्या एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. त्यातील सर्वात सामान्य अपेक्षा म्हणजे मुलाची चांगली किंवा सरकारी नोकरी असावी. पण मुलं मात्र मिळाली तरी खूप अशा भूमिकेत असतात. कारण मुलांना आता मुली मिळणं कठीण झालंय. मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्या पूर्ण करता करता मुलांच्या नाकी नऊ येतात. दरम्यान पुणे तिथे काय उणे, पुण्यातल्या अशाच एका तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं त्यानं एक बायोडेटा बनवून त्याचं पोस्टर छापलं आहे. हे पोस्टर त्यानं चौका चोकात लावलं आहे. दरम्यान या तरुणाचा बायोडेटा वातून तुम्हीही पोट धरुन हसाल.

लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी शोधण्यासाठी एका व्यक्तीने असा अनोखा मार्ग शोधला की सारेच हैराण झाले. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वधू किंवा वर शोधण्यासाठी लोक काय-काय करतात? नातेवाईकांना आपला लग्नाचा बायोडेटा शेअर करतात. मॅट्रिमोनिअल साइट्सची मदत घेतात किंवा वर्तमानपत्रात जाहिराती देतात. अशा प्रकारे वधू किंवा वराची शोध मोहीम सुरु होते. जोपर्यंत आपल्या मनासारखा जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत आपली शोध प्रक्रिया चालू राहते . जेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार भेटतो, तेव्हा आपण आपली शोध प्रक्रिया थांबवतो.पण एका पठ्ठ्याने वधू शोधण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.

या तरुणाच्या बायोडेटावर सर्वसामान्यपणे जशी माहिती असते तशी दिलेली आहे. म्हणजेच, मुलाची माहिती. नाव – मनिष खामकर, गावं – वाटेगांव, शिक्षण – १२वी पास, शेती – १ एकर, नोकरी – पुण्याला कामाला. इथपर्यंत सगळं ठिक होतं मात्र या बायोडोटाच्या शेवटी या पुणेकर तरुणानं जे लिहलंय ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. शेवटचा पर्याय म्हणत या तरुणानं त्याच्या बायोडोटाच्या शेवटी, “अपेक्षा – पोरगी कसली पण असुदे फक्त जीवंत पाहिजे.” अशी अपेक्षा लिहली आहे

पाहा बायोटेडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> बापरे! पालकांच्या हलगर्जीपणामुळे बाळ उकळत्या पाण्यात पडलं; VIDEO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल

हा फोटो सोशल मीडियावर aamhi_parbhanikar_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक यावर कमेंटही करत आहेत.