Python Rescues Shocking Video : साप, अजगर या प्राण्यांची नावे काढली तरी घाबरायला होते; पण पावसाळ्यात हे प्राणी सर्रासपणे मानवी वस्तीत दिसून येतात. कधी पाण्याच्या प्रवाहाबरोबर, तर कधी अन्नाच्या शोधात ते मानवी वस्तीत शिरतात. त्यात अजगर हा अतिशय शांतपणे शिकार करणारा प्राणी असला तरी एकदा का शिकार त्याच्या तावडीत सापडली की, तो ती जिवंत गिळायलाही मागे-पुढे पाहत नाही. तो अतिशय क्रूरपणे शिकार करतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महाकाय अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण महाकाय अजगराला कचऱ्याच्या डब्यातून रेस्क्यू करताना दिसतोय.
महाकाय अजगराचा हा व्हिडीओ लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमधील द पियरोट अपार्टमेंट्सच्या पार्किंग गॅरेजमधील आहे, जिथे उपस्थित काही लोकांना अपार्टमेंटमधील एका मोठ्या कचऱ्याच्या डब्यात २० फूट लांबीचा अजगर रेंगाळताना दिसला. हे दृश्य पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, त्यांनी लगेच सर्पमित्र जोसेफ हार्ट यांना बोलावले. त्यांनी कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय उघड्या हातांनी अजगराला रेस्क्यू केले.
तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, सर्पमित्र जोसेफ हार्ट कचऱ्याच्या डब्यात बसतो. त्यानंतर सावकाश पुढे जात, तो काळजीपूर्वक अजगर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. २० फूट लांबीच्या अजगराला नियंत्रित करण्यासाठी तो आधी त्याचे तोंड पकडतो आणि त्याला खेचत बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतो. पण, अजगराचे वजन इतके जास्त होतं की, एकट्यानं त्याला बाहेर काढणं अवघड झालं. त्यामुळे तो अजगराचं तोंड सोडून देतो. नंतर तो पुन्हा कचऱ्याच्या डब्यात जाऊन त्याचं शरीर आधी उचलून आपल्या अंगावर घेतो आणि बाहेर उडी मारतो. त्यानं हल्ला करू नये या उद्देशानं तो पुन्हा त्याचं तोंड पकडतो. यावेळी अजगर त्याच्या पायापासून संपूर्ण शरीराभोवती आपला विळखा घालतो; पण तरीही तो सर्पमित्र शांतपणे त्याला हाताळताना दिसतोय.
अशा प्रकारे या महाकाय अजगराला सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आले. @Reptile.hunter नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी हे रेस्क्यू ऑपरेशन फारच भीतीदायक होते. असे म्हटले आहे, तर काहींनी सर्पमित्राच्या धाडसाचे कौतुक केले आहे.