ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल अनेकांना कुतूहल आहेत. दिर्घकाळ गादीवर असलेल्या त्या ब्रिटिश राजघराण्यातल्या एकमेव व्यक्ती आहे. राणीने आपल्या वयाची नव्वदी ओलांडली आहे त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी छापून येत असतात पण या राणीभोवती अनेक कथाही गुंतल्या आहे. या राणीच्या दिमतीला शेकडो नोकर आहेत, राणी फार बोलत नाही खाणा खुणा करून त्या आपल्या नोकरांना सूचना देतात. आता राणीबद्दल आणखी एक गोष्ट अशीही समोर आली आहे की जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. राणीच्या महागड्या सँडल घालून फिरण्यासाठी बंकिंगहम पॅलेसमध्ये खास ‘फूटवूमन’ची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचा : यासाठी राणीच्या हातात नेहमी पर्स असतेच

राणी एका महागड्या ब्रँडच्या सँडल वापरते. हा ब्रँड खास राणींसाठी स्टाईलिश पण आरामदायी सँडल बनवतो. याची डिझाइनही खास प्रकारे तयार करण्यात आली आहे. राणीसाठी त्या अधिकाअधिक आरामदायी व्हाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असतो पण शेवटी चूक ती होणारच. नवीन सँडल घातल्या की पाय सुजणे किंवा शू बाईट होणे हे प्रकार असतातच, पण राणींच्या पायांना असा कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही फूटवूमन ठेवली आहे. राणीच्या सँडल घालून फक्त राजमहालात ये जा करणे इतकेच तिचे काम. म्हणजे नव्या सँडल घातल्या घातल्या जो काही त्रास होतो तो राणीला होणार नाही, थोडक्यात काय जो त्रास होईल तो तिला होईल. म्हणजे दुकानातून नव्या सँडल्स आणल्या की राणीसाठी वापरण्या योग्य बनवण्याची जबाबदारी तिची.

वाचा : हे नियम ब्रिटनची राणीसुध्दा मोडू शकत नाही!

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]