टेनिसपटू राफेल नदाल याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. राफेल नदालचा सामना पाहण्यासाठी असंख्य टेनिसप्रेमी टेनिसकोर्टवर जमले होते. याच गर्दीत माय-लेकींची ताटातूट झाली. त्यानंतर आपल्या छोट्या मुलीला टेनिसकोर्टवर शोधण्यासाठी आईची धडपड सुरू झाली. ही आई रडत आपल्या हरवलेल्या मुलीला कोर्टमध्ये हाका मारत होती. परंतु अनेक जण राफेलचा सामना पाहण्यात मग्न होते त्यामुळे या आईचा आक्रोश कित्येकांच्या कानी गेला नाही.
तेव्हा अचानक राफेलचे लक्ष या रडणा-या आईकडे गेले आणि त्याने तात्काळ सामना थांबवला. आईला आपल्या मुलीचा शोध घेता यावा यासाठी त्याने काही काळासाठी तो थांबवला. त्यानंतर सगळेच या मुलीचा शोध घेऊ लागले. काही मिनिटांनी ही मुलगी प्रेक्षकांच्या गर्दीत रडत असताना एकाने लक्षात आणून दिले. तेव्हा आईने धावत जाऊन आपल्या मुलीला मिठीत घेतले. हे दृश्य राफेल लांबून पाहत होता. ते पाहताना राफेलच्या चेह-यावर समाधानाचे हास्य उमटले आनंदाचे हे क्षण कॅमेरामध्ये कैद झाले. मायलेकींची भेट झाल्यावर टेनिसकोर्टवर जमलेल्या अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रु आले राफेलच्या प्रतिस्पर्ध्याला देखील ते आवरता आले नाही. व्हिवो आरएन प्रोडक्शनचा हा व्हिडिओ असून त्यांनी तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2016 रोजी प्रकाशित
Viral video : माणुसकी जपणारी टेनिसपटू राफेल नदालची अनोखी ‘सर्व्हिस’
हरवलेल्या माय-लेकींची भेट घालून देण्यासाठी टेनिसपटू राफेलने खेळ थांबवला
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-09-2016 at 19:54 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal halts match