सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण जवळपास दररोज व्हिडीओज आणि फोटोजच्या माध्यमातून जगभरातील नव्या नव्या भन्नाट लोकांना जाणून घेत असतो. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची लोकं पाहत असतो, जी आपल्याला पुरती भुरळ पाडतात. बेंगळुरूच्या एक आजीबाई देखील त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आहेत. शचिना हेगरने इन्स्टाग्रामवर २ व्हिडीओ क्लिप्स शेअर केल्या आहेत. या दोन्ही २ व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या रस्त्यावर चिंध्या गोळा करणाऱ्या एका आजीने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल कि असं या व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय? तर जाणून घेऊया
बायबल दाखवत ‘ती’ म्हणाली…
शचिना हेगरने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सेसिलिया मार्गारेट लॉरेन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजीने एक छोटंसं जिंगल अगदी अस्खलित इंग्रजीमध्ये गाऊन दाखवलं आहे. ११ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. या आजीच्या अर्थात लॉरेन्सच्या केसांमध्ये चमकदार बारीक लाल फुलं होती. तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती. या व्हिडिओमध्ये लॉरेन्स आपल्या हातात बायबल घेऊन दिसत आहे. हेगरने तिला विचारलं की तू एकटी आहेस का? तर लॉरेन्स त्यावर लगेच बायबल दाखवत म्हणाली की, नाही. माझा देव नेहमी माझ्यासोबत आहे.
‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल
View this post on Instagram
लॉरेन्सने सांगितल्या जपानच्या गोष्टी
शचिना हेगरने शेअर केलेला हा पहिला व्हिडीओ पाहून जर तुम्ही लॉरेन्सच्या इंग्रजीवर प्रभावित झाला असाल तर आता हा आता हा आणखी एक व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये ती बरीच वर्षे जपानमध्ये कशी राहिली? याबद्दल सांगत आहे. लॉरेन्सचं व्यक्तिमत्व अक्षरशः भुरळ पाडणारं आहे. सोशल मीडियावर तर तिच्या या दोन्ही व्हिडीओजची प्रचंड चर्चा आहे. नेटिझन्सना लॉरेन्सच्या या क्लिप प्रचंड आवडल्या आणि तिच्याबद्दल प्रचंड कौतुक देखील वाटलं.
View this post on Instagram
नेटिझन्सना पडली भुरळ
अनेकांनी लॉरेन्सला मदत करण्यासाठी हेगरकडे तिच्याशी संपर्क करण्यासाठीच्या तपशीलांची विचारणा देखील केली. एका इन्स्टाग्राम युझरने “हे खूप प्रेरणादायी आहे. ती एकटी नाही हे तिनं ज्या पद्धतीने सांगितलं ते मला खूप आवडलं.. देव तिला आशीर्वाद देवो” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरने म्हटलं आहे कि, “मला खात्री आहे तिच्याकडे सांगण्यासाठी आणखी खूप कथा असतील.”