मार्च महिना सुरू झाला की भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे वेध लागतात आणि सध्या भारतात आयपीएल सुरू आहे, ज्याची प्रत्येक भारतीयांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांचे समर्थक चाहते प्रत्येक सामना पाहण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर पोहोचतात. पण, काहीवेळा चाहत्यांमध्ये तणाव निर्माण होतो, ज्यामुळे त्यांच्यात भांडण होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये क्रिकेट चाहते आपापसात भांडताना दिसत आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आयपीएल पाहण्यासाठी आलेल्या दोन व्यक्ती एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. भांडण फार पेटल्याने तेथे उपस्थित असलेला पांढरा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही. त्याच कुणीही ऐकत नाही आणि हाणामारी सुरूच असते. यानंतर भांडण करणाऱ्या त्या दोन व्यक्तींमधील एक व्यक्ती भांडण थांबवणाऱ्या त्या पांढरा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीशीच भांडू लागते. मारामारीची माहिती मिळताच कर्मचारी तेथे पोहोचून त्यांना शांत करतात. हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @gharkekalesh नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने सांगितले की, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये चाहत्यांमध्ये मारामारी झाली.

(हे ही वाचा : रेल्वेच्या आरक्षित कोचमध्ये फुकट्यांची मोठी गर्दी; व्हायरल पोस्टवर रेल्वेचे ‘असे’ उत्तर ऐकून प्रवाशांनी व्यक्त केला संताप )

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

वृत्त लिहिपर्यंत १३ हजार लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकही मज्जा करू लागले. एका युजरने लिहिले, “आता हा संघर्ष संपूर्ण आयपीएलमध्ये दिसेल, ते विनाकारण भांडतात.” २८ मार्च २०२४ रोजी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा नववा सामना खेळवला गेला. राजस्थानने हा सामना १२ धावांनी जिंकला आहे. १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकांत ५ गडी गमावून १७३ धावाच करू शकला.