Heart Attack Shocking Video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. याच दरम्यान अशीच एक दुर्देवी घटना राजस्थानमधून समोर आली आहे,ज्यात भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचताना अचानक मामा जमिनीवर कोसळतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओतून कधी काय होईल कुणीही सांगू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका विवाह सोहळ्यात वराच्या मामाचा मृत्यू झाल्याने या उत्सवात शोककळा पसरली. कमलेश ढाका असं मृत व्यक्तीचं नाव असून ह्रदयविकाराचा झटका आल्यानं कमलेश ढाका यांचा मृत्यू झालाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती डोक्यावर मडकं घेऊन राजस्थानी पद्धतीचं नृत्य करत आहे. आजूबाजूला इतर महिलाही पारंपारिक पोषाखात नृत्य करताना दिसत आहेत. यावेळी नाचचा नाचता अचानक तो व्यक्ती जमिनीवर कोसळतो. अचानक कोसळल्यामुळे आजूबाजूचे लोकंही चकित होतात. कमलेश हे २० एप्रिल रोजी आपल्या भाच्याच्या लग्नासाठी लोछवा येथे आले होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Accident: घर गाठण्याआधी काळाने गाठलं! गुजरातमध्ये बसचालकाची मुजोरी बाईकस्वाराच्या जीवावर बेतली

नवरदावाचे काका सुलतान सिंग यांनी सांगितले की, त्यादरम्यान कमलेश ढाका यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडले. हे पाहून विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले लोक थक्क झाले. त्यानंतर कमलेश ढाका यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कमलेश ढाका यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वराच्या मामाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण लग्नसोहळ्याचे वातावरण शोकाकुल झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. तसेच नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.