Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात काही व्हिडीओ पाहून धडकी भरते. नुकतेच रक्षाबंधन पार पडले याचनिमित्त एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. असं रक्षाबंधन तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिल नसेल, कारण एका महिलेनं चक्क बिबट्याला राखी बांधली आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रक्षाबंधनाचा दिवस साजरा करताना दिसून येत आहे पण कोणत्या व्यक्तीसोबत नाही तर चक्क एक घायाळ बिबट्या तिने आपला भाऊ मनात त्याला राखी बांधताना ती व्हिडिओत दिसून आली आहे. बिबट्या सारखा धोकादायक शिकारी ज्याला पाहताच लोक पळू लागतात अशा जंगलातील शिकाऱ्याला महिला राखी बांधत असल्याचे पाहून सर्वच अवाक् झाले.

राजस्थानमधील एक अनोखा आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ग्रामीण महिला बिबट्याला राखी बांधताना दिसत आहे. ती एका हृदयस्पर्शी हावभावाने लोकांना बिबट्याला वाचवण्याचे आवाहन करते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी महिलेचे कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये, ती महिला तिच्या घराजवळील शेताच्या काठावर बसलेली दिसते आणि तिच्या समोर एक बिबट्या शांत स्थितीत बसलेला आहे. ती महिला काळजीपूर्वक त्याचा पंजा पकडते, राखी बांधते आणि त्याला मिठाई खायला घालण्याचा प्रयत्न करते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बिबट्या आक्रमक होण्याऐवजी पूर्णपणे शांत राहतो आणि भाऊ जसा हात पुढे करतो तसा हात पुढे करतो..

पाहा व्हिडीओ

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दृश्य भावनिक वाटत असले तरी ते अत्यंत धोकादायक आहे. बिबट्यासारखे वन्य प्राणी कधीही हल्ला करू शकतात. सध्या, विभागाने परिसरात देखरेख वाढवली आहे आणि बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @GemsOfIndia_X नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.