Rakul Preet- Jackky Bhagnani Wedding: देशात सेलिब्रिटीजच्या लग्नाची नेहमीच चर्चा असते. कारण या लग्नांमध्ये पाहुण्यापासून तर सर्वच तयारी ही खूप खास असते. बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. रकुल आणि जॅकीने २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न केले. जवळचे नातेवाईक आणि कुटुंबींयाच्या उपस्थितीमध्ये दोघांनी लग्न केले. रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या दोघांवर देखील चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी गोव्यात ज्या ग्रँड हॉटेलमध्ये लग्न केलं त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
साऊथ गोव्यातील आयटीसी ग्रँडमध्ये रकुल आणि जॅकी लग्नबंधनात अडकले. ४५ एकर जमिनीवर पसरलेला हा रिसॉर्ट अत्यंत शांत ठिकाणी आहे. जॅकी आणि रकुलने या हॉटेलची निवड करताच अनेकांना त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मोठ्या हॉटेलमध्ये लग्न करण्यासाठी या प्रसिद्ध जोडप्याने किती पैसे खर्च केले माहितीये का?
‘मेक माय ट्रिप’नुसार गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये एका रुमची किंमत १९ हजार रुपयांपासून सुरू होते. ही किंमत ७५ हजार रुपयांपर्यंत पोहोचते. यात इतर टॅक्सचाही समावेश आहे. कुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी याचं लग्न पूर्णपणे इको फ्रेंडली पद्धतीने झालं. तसेच, लग्नात कोणत्याही क्षणी कोणतेही फटाके फोडले गेले नाही.
पाहा फोटो
हेही वाचा >> नवरी मिळेना नवऱ्याला; तरुणानं लावलं असं डोकं की…संपूर्ण शहरात बनलाय चर्चेचा विषय
चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल लग्नबंधनात अडकले. मीडिया रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी यांनी लग्नात तरुण तहिलयानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पीकॉक, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या पाच डिझायनरने तयार केलेले कपडे परिधान केले होते.लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.