Ras Malai Ranked 2nd In Best Cheese Dessert : गोड पदार्थ्यांशिवाय भारतीयांचे जेवण पूर्ण होऊ शकत नाही. विशेष म्हणजे भारतात प्रत्येक राज्यानुसार खाद्यसंस्कृती बदलते, त्यामुळे गोड पदार्थ्यांमध्येही आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. भारतातील याच गोड पदार्थ्यांमधील रसमलाई हा प्रकार अनेकांना खाण्यास आवडतो. याच रसमलाईने केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशातील लोकांनासुद्धा भुरळ घातली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध चीज डेझर्टच्या यादीत रसमलाईने दुसरे स्थान पटकावले आहे. केशर, ड्रायफ्रूट्स, दूध मलाईपासून बनवलेली ही रसमलाई जगात भारी ठरली आहे.

जगभरातील सर्वात १० प्रसिद्ध चीज डेझर्टच्या यादीत भारताच्या रसमलाईने दुसरे स्थान पटकावले आहे. प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईड TasteAtlas ने सर्वात प्रसिद्ध १० चीज डेझर्टची यादी जाहीर केली आहे. या यादीत रसमलाईने दुसरे स्थान पटकावले आहे.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
D gukesh
‘टोरंटोत भारतीय भूकंप’; कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशचे कास्पारोवकडून कौतुक; विजयाचे श्रेय आनंदलाही
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल

या यादीत पोलंडचा सेर्निक हा पदार्थ पहिल्या क्रमांकावर आहे. हा पदार्थ टवारोग नावाच्या चीजपासून बनवला जातो. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताची रसमलाई आहे.

रसमलाई हा पदार्थ स्पाँजी फ्रेश चीज म्हणजे छेना आणि गोड क्रीमपासून तयार केला जात. छेना हा साखरेच्या पाकात शिजवला जातो. यानंतर तो गोड दुधाच्या पाकात भिजवला जातो. या पाकाला रबडी असे म्हणतात. यात नंतर केशर, वेलची, ड्रायफ्रुट्स टाकले जातात. भारतात अनेकांना रसमलाई खायला आवडते. लग्नसोहळा असो वा सणसमारंभ, तोंड गोड करण्यासाठी रसमलाईचा बेत आखला जातो.

जगप्रसिद्ध १० चीज डेझर्टच्या यादीत ‘या’ पदार्थांचा समावेश

जगभरातील सर्वात १० प्रसिद्ध चीज डेझर्टच्या यादीत अमेरिकेतील क्लासिक न्यूयॉर्क स्टाईल चीजकेक, जॅपेनिझ चीजकेक, स्पेनमधील बास्क चीजकेक, ग्रीसमधील स्फाकियानोपिता, हंगेरीतील राकोझी तुरोस, ग्रीसमधील मेलोपित, जर्मनीमधील कासेकुचेन आणि झेक रिपब्लिकमधील मिसा रेझी या गोड पदार्थांचा समावेश आहे.