विजया दशमीला सर्वत्र रावण दहन केले जाते. अनेक ठिकाणी यासाठी मोठे आयोजन केले जाते. रावणाचा भव्य पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. अशावेळी हा भव्य पुतळा जाळल्यानंतर त्यामधून उपस्थित असणाऱ्या लोकांना काही इजा होणार नाही किंवा इतर काही समस्या उद्भवणार नाही याची आधीच काळजी घ्यावी लागते. सर्व पुर्वतयारी करूनही काहीवेळा अचानक काहीतरी गडबड होतेच आणि त्यामुळे मोठे संकट ओढवू शकते. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मुजफ्फर नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रावण दहनाचा आहे. या रावण दहनाच्या वेळी अचानक रावणाच्या पुतळ्यातून अग्निबाण निघू लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक हे अग्निबाण कुठून येत आहेत हे आधी कोणालाच समजले नाही. पण जसजसे एकापाठोपाठ एक अग्निबाण येतच राहिले तेव्हा जीव वाचवण्यासाठी लोकांनी तिथून पळ काढायला सुरूवात केली.

आणखी वाचा : रेल्वे प्रवासादरम्यान छातीमध्ये दुखू लागलं अन्…; RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले त्याचे प्राण

व्हायरल होणारा व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून रावणाने रागात हे अग्निबाण सोडले असल्याचे वाटू शकते. अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत रावणाने रागात आणि ‘सेल्फ डीफेन्स’मध्ये हे अग्निबाण सोडल्याचे म्हटले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नाही. लोकांची उडालेली तारांबळ आणि रावणाचे रौद्र रुप दाखवणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.