Engineer rejected 8 times by Google India: भारत आणि एकूणच जगभरातील अनेकांसाठी गुगलमध्ये नोकरी मिळणं म्हणजे करिअरमधला टर्निंग पॉइंट. ही कंपनी केवळ त्यांच्या उत्कृष्ट उत्पादनांसाठीच नाही, तर अनेक फायदे, विविध संधी आणि उद्योगात उत्कृष्ट प्रतिमा देण्यासाठी देखील ओळखली जाते. अनेकजण इथे इंटरव्यूह देतात आणि नाकारले जातात. अशाच एका भारतीय इंजिनिअरने गुगल इंडियामध्ये उत्पादन व्यवस्थापकाचं पद मिळवण्याच्या वारंवार अयशस्वी प्रयत्नांनंतरची निराशा रेडिटवर शेअर केली. त्याची ही प्रामाणिक पोस्ट अनेकांसाठी उपयोगी ठरली आहे. या पोस्टमुळे आयटी कंपनीतील भरतीच्या स्पर्धात्मकतेबाबत बरीच चर्चा झाली.
इंजिनियरने काय अनुभव शेअर केला?
एका भारतीय इंजिनियरने गुगलमध्ये काम करण्याचे त्याचे स्वप्न अर्धवट सोडून दिले आहे. त्याच्या अगदी १०० टक्के पूरेपूर प्रयत्नांनंतरही गुगल इंडियामध्ये नोकरी मिळवणं त्याला अशक्य झालं. याबाबतचा अनुभव त्याने शेअर केला आहे. जेव्हा पण त्याने इंटरव्यूह दिला, तेव्हा एकतर त्याला उत्तरच मिळाले नाही किंवा नकार मिळाला.
“गुगलमध्ये प्रवेश करणे अशक्य वाटते. मी हार मानत आहे”, असं शीर्षक असलेली पोस्ट त्याने रेडिटवर शेअर केली. या इंजिनियरला फिनटेक क्षेत्रात उत्पादन व्यवस्थापक म्हणून साडेचार वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्याच्या बायोडेटामध्ये टियर १ एमबीए, टियर २ अभियांत्रिकी पदवी आणि १ लाखांहून अधिक सबस्क्रायबर असलेल्या त्याच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. यानुसार तो गुगलमध्ये काम करण्यासाठी परफेक्ट आहे असं दिसून येतं.
गेल्या तीन ते चार महिन्यांत त्याने किमान आठ वेळा या पदासाठी अर्ज केला. प्रत्येक वेळी त्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त त्याने ज्या पदांसाठी अर्ज केला होता, त्या पदांसाठी त्याने सविस्तर मॉक-अप आणि स्ट्रॅटेजी डॉक्युमेट्स तयार करून त्याने अधिक प्रयत्न केले. “४० ई-मेल, लिंक्ड इन आणि व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले असतील. ते रिटर्न किंवा रिजेक्शनमध्ये मिळणार.” गुगलमकडून प्रतिक्रिया न मिळण्याबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. गुगलमध्ये सध्या काम करणाऱ्या मित्रांकडून मिळालेल्या रेफरन्समुळेही त्याला पहिल्या फेरीत जाण्यास मदत झाली नाही असेही त्याने म्हटले.
इंजिनियरच्या या पोस्टनंतर रेडिट युजर्सनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. काहींनी त्याच्या संघर्षांबद्दल सहानुभूती दर्शवली, तर काहींनी आयटी क्षेत्राबद्दलची कठोर सद्यस्थिती मांडल्याचे म्हटले आहे.
मी ही पोस्ट वाचली, तेव्हा मला हसू आलं की गुगलसाठी कुणी ३ ते ४ वर्षे प्रयत्न करतात असे एका युजरने म्हटले आहे. काहींनी त्याला त्याचे युट्यूब चॅनेल लपवण्याचाही सल्ला दिला. काहींनी त्याला सल्ला दिला की, गुगलच्या जॉब लिस्टिंगमध्ये ५ वर्षांपेक्षा अनुभव आवश्यक असतो.