जर जंगलाच्या रस्त्यावरून गाडीने जात असाल तर गाडी सावधपणे चालवावी लागते. कारण अनेकदा जंगल परिसरात बनवलेले रस्ते अनेक प्राणी ओलांडत असतात आणि अशा परिस्थितीत मोठा अपघात होऊ शकतो. त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. अलीकडेच असेच दृश्य पाहण्यात आले, जेव्हा एका माणसाने रस्ता ओलांडणाऱ्या हत्तीसाठी आपली कार थांबवली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही बाजूंना जंगल असलेला रस्ता आहे. अचानक एका बाजूने हत्तींचा एक मोठा कळप निघतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जंगलातून मधोमध जाणारा रस्ता ओलांडू लागतात. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती बहुधा कारमध्ये बसून हा क्षण रेकॉर्ड करत आहे. हा क्षण अगदी अनोखा आहे, कारण एका कळपात अनेक हत्ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात आहेत, पण याहून अनोखी गोष्ट म्हणजे जेव्हा सर्व हत्ती जवळजवळ निघून जातात, शेवटी उरलेला हत्ती मागे राहतो. पण समोरून येणारा बाईकस्वार पाहून हा हत्ती आपली सोंड वर करतो आणि रस्ता ओलांडू लागतो. पण यात बाईकस्वाराचा काहीसा गोंधळ होतो आणि यात जवळजवळ तो हत्तीला धडक देणारच होता. पण तितक्यात त्याने बाईकवर कसंबसं नियंत्रण ठेवलं आणि हत्तीला रस्ता ओलांडू दिला. हत्ती त्या बाईकस्वाराला पाहून जेव्हा आपली सोंड वर करतो, ते जणू काही तो बाईक थांबवण्यासाठी इशाराच देत होता की काय असं वाटू लागतं.

हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. आपल्या आश्चर्यकारक व्हिडिओंसाठी हे ट्विटर अकाउंट प्रसिद्ध आहे. प्राण्यांशी संबंधित अनेक मजेदार आणि गोंडस व्हिडीओ या अकाउंटवरून शेअर केले जातात, ज्यामध्ये प्राण्यांची मजा स्पष्टपणे दिसत आहे. नुकताच शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की प्राणीही हूबेहूब माणसांसारखे वागू लागले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वर्गातच दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : छोटा चिंपांझी वाघाच्या पिल्लाला प्रेमाने मिठी मारतानाचा VIDEO VIRAL, लहानपणीच्या आठवणीत रमले नेटकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ४७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १७०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.