Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणाची हत्या तर कधी कोणाच्या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी डॅश कॅमेरात कैद झालेले रस्ते अपघाताचे व्हिडीओ तर कधी सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेले भयानक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येतात. यात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अपघाताचे प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दर दिवशी अपघाताचे व्हिडीओ आपल्या समोर येतात. काही अपघाताचे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक दुचाकी चालक तरुण मरता मरता वाचतो. हा अपघाताचा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीही स्तब्ध व्हाल.

मरता मरता वाचला तरुण

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पाऊस सुरू आहे. रस्त्यावरून एक तरुण दुचाकी चालवत जात असतो आणि पावसाच्या पाण्यामुळे त्याची बाईक घसरते आणि तो रस्त्यावर पडतो. तितक्यात एक मागून भरधाव वेगाने ट्रक येतो आणि तेव्हा तो तरुण जीव मुठीत घेऊन धावतो आणि स्वत:ला वाचवतो. त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण रस्त्याच्या बाजूने पडतो आणि त्यानंतर उठून उभा होतो. विशेष म्हणजे तरुणाने हेल्मेट घातलेले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की’देव तारी त्याला कोण मारी’ या घटनेचा व्हिडीओ एका कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
dance video
आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
a delivery boy made jugaad
VIDEO : उन्हापासून वाचण्यासाठी डिलिव्हरी बॉयचा अनोखा जुगाड, व्हिडीओ होतोय व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
pune old memorie
Pune : आठवणीतले पुणे! जुन्या PMT ने तुम्ही कधी प्रवास केला का? VIDEO व्हायरल
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : तुझ्या जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसणारी तरुणी इतरांच्या हातावर काढतेय सुंदर मेहेंदी, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : असा बॉयफ्रेंड शोधूनही सापडणार नाही! गर्लफ्रेंडचा राग घालवण्यासाठी थेट लोकांसमोर काढल्या उठाबशा, VIDEO व्हायरल

MikeSonko या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “देवाने त्याला वाचवले.” तर एका युजरने लिहिलेय, “मरता मरता वाचला, ही देवाची कृपा आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “पाऊस सुरू असताना गाडी हळू चालवावी” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून आश्चर्यचकीत झाले आहे.