जंगल सफारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडीओ पाहून आपण कधी थक्क होतो तर कधी आश्चर्यचकीत होतो. जंगल सफारी करताना अनेकदा पर्यटकांना जंगलातील वाघ, सिंह, जंगलातील अन्य प्राणी पक्षी दिसतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तीन सिंहांनी जंगल सफारीसाठी असलेल्या वाहनांचा रस्ता ब्लॉक केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन सिंह रस्त्याच्या मधोमध झोपलेले आहे. या ठिकाणी अनेक वाहने आहेत. याच दरम्यान एक तिसरा सिंह सुद्धा या ठिकाणी येतो आणि त्या दोन सिंहांजवळ जातो आणि त्यांच्याबरोबर रस्त्याच्या मधोमध झोपतो. या तीन सिंहांनी सुपर्ण रस्ता ब्लॉक केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. गाड्यांमध्ये असणारे जंगल सफारी करणारे लोक या सिंहांचे व्हिडीओ बनवत आहे.

हेही वाचा : Viral Video : दादा जोमात बाकी कोमात! बायकोला सर्वांसमोर कडेवर उचललं, पाहा तुफान डान्स

@buitengebieden या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “टांझानियामध्ये रोडब्लॉक” टांझानिया हा पूर्व ऑफ्रिकेतील एक देश आहे. येथील जंगल सफारी जगप्रसिद्ध आहे. दरदिवशी हजारो पर्यटक येथे जातात.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” त्यांनी आराम केला पाहिजे कारणे ते जंगलातील राजा आहे.” तर एका युजरने लिहिले आहे, “हा आजवरचा सर्वात चांगला रोडब्लॉक होता”