RPF Personnel Viral Video: सध्याच्या स्वार्थी युगात माणुसकी हरवत चालली आहे की काय, असं चित्र दिसून येत होतं. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये या गोष्टीला तिलांजली मिळाली आहे. सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? पण, काही व्हिडीओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका पोलिसानं वृद्ध आजोबांना ज्याप्रकारे मदत केलीय ते पाहून तुम्हीही म्हणाल, आपल्याला समाजात अशा आणखी लोकांची आवश्यकता आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आरपीएफ जवान एका शारीरिकदृष्ट्या अपंग वृद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन ट्रेनमध्ये जाताना आणि नंतर त्याला सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढवून परतताना दिसत आहे.खरंतर ट्रेन सुटण्याची वेळ झाली होती आणि कुबड्यांच्या मदतीने चालणारा वृद्ध माणूस वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होता. पण, तेवढ्यात एका आरपीएफ जवानाला तो दिसतो. तो त्याच्याकडे येतो आणि त्याच्या कुबड्या हातात घेतो आणि त्याला खांद्यावर उचलतो. व्हिडिओमध्ये तो वृद्धाला खांद्यावर घेऊन ओव्हरब्रिज आणि पायऱ्या ओलांडून धावत जातो आणि नंतर त्याला ट्रेनमध्ये चढवतो असे दिसते. व्हिडिओच्या शेवटी, तो भारावलेला वृद्ध आरपीएफ जवानाच्या डोक्याला हात लावताना दिसतो.
पाहा व्हिडीओ
एक्सवर पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी पोलिसांचे खूप कौतुक केले आहे. लोकांमध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे यावर वापरकर्ते सहमत असल्याचे दिसून आले. तसेच, काही वापरकर्त्यांनी म्हटले की जर प्रत्येक पोलिसाने अशा प्रकारे जनतेची सेवा केली तर समाजात नक्कीच सुधारणा होईल, “शेवटी हिशोब कर्माचा होतो”. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “चांगले काम केले पण फक्त कॅमेऱ्यासाठी, त्यानंतर ते काय करतात हे सर्वांना माहिती आहे.” दुसऱ्या युजरने म्हटले, “खरोखर, चांगल्या लोकांमुळेच देश आणि जग टिकत आहे, नाहीतर आजकाल माणसं प्राण्यांपेक्षाही वाईट झाले आहेत.”तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “ही रील आहे का? जर नसेल तर ती प्रशंसनीय आहे. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “पोलिसांचेही दोन प्रकार असतात. काही निदर्शकांवर लाठीचार्ज करतात आणि काही जनतेची सेवा करतात.”