Russia Ukraine War Fact Check Video : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये भीषण स्फोटानंतर उसळलेल्या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. या व्हिडीओवर युजर्स असा दावा करत आहेत की, हा व्हिडीओ रशिया युक्रेनवर तीव्र हल्ले करत असल्याचे दर्शवतो. दरम्यान, या व्हिडीओत भलेमोठे इंधन टँक आगीत उद्धवस्त झाल्याचे दिसत आहेत. पण, खरंच हा व्हिडीओ रशिया-युक्रेन युद्धातील आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं, तेच आपण जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर मनोज सिंगने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील असेच दावे करून हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला एक्सवर एक पोस्ट सापडली, ज्यात व्हिडीओ यूएईमधील असल्याचे म्हटले होते.

कीवर्ड सर्च करताना आम्हाला द पेनिनसुला कतारच्या फेसबुक पेजवर तीन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला व्हिडीओ आढळला.

कॅप्शनमध्ये म्हटले होते : स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आज पहाटे शारजाहमधील अल हमरिया बंदरात भीषण आग लागली, ज्यात ज्वलनशील पदार्थ भस्मसात झाले. यूएई नागरी संरक्षण, शारजाह पोलिस आणि राष्ट्रीय रक्षक दलाकडून ही आपत्कालीन स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आम्हाला thenationalnews.com वर याबाबतची बातमी मिळाली.

https://www.thenationalnews.com/video/sUxyzmta/raging-fire-at-sharjahs-al-hamriyah-port-brought-under-control

आम्हाला khaleejtimes.com वरही एक बातमी मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.khaleejtimes.com/uae/emergencies/sharjah-fire-breaks-out-in-fuel-warehouse-blaze-under-control?fbclid=IwY2xjawKquY5leHRuA2FlbQIxMABicmlkETFBTWpYNEI0Ym5jVnhxAR4xHPSwIx8UkZyuH09gPHvf4kc4-kxxLQENYdUa4WGNdrlvM6ItWnsCDexQGw_aem_opTLl1Nz-eIIVblOCsRlMw&botrequest=true

निष्कर्ष : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडीओ प्रत्यक्षात शारजाहमधील अल हमरिया बंदरात लागलेल्या भीषण आगीच्या घटनेचा आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.