रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोशल मीडियावर अनेकजण आपापली मतं मांडत आहेत. दरम्यान, एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलगी युद्ध थांबवण्यास सांगत आहे. ब्रिटनी आणि लिली नावाच्या पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

व्हिडीओमध्ये लिली नावाची मुलगी शांततेचे आवाहन करताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही युक्रेन आणि प्रभावित सर्व निष्पाप लोकांसाठी प्रार्थना करत आहोत,” त्या मुलीसह ती म्हणाली, “मला पृथ्वीवर शांतता हवी आहे, पृथ्वीचे तुकडे नाही, आपण भाऊ आणि बहिणी आहोत, युद्ध थांबवा, “

(हे ही वाचा: Viral: सोने तस्करीचा फॅशनेबल प्रयत्न; बुरख्यालाच सोन्याचे मणी लावून भारतात आली पण…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: Russia Ukraine War: अमेरिका कॅनडातील वाइन शॉप्सनी व्होडकावर काढला राग; ओतून रिकाम्या केल्या बाटल्या)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले, “जो कोणी बाहेरून हस्तक्षेप करण्याचा विचार करेल,जर तुम्ही असे केले तर तुम्हाला इतिहासातील कोणत्याही परिणामांपेक्षा अधिक परिणामांना सामोरे जावे लागेल.”