Sachin Tendulkar Farm Stay: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदा वयाची हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. इतक्या महत्त्वाच्या दिवसासाठी तेंडुलकर कुटुंबीयांनी सेलिब्रेशनही फार खास पद्धतीने केले होते. सचिन तेंडुलकर, अंजली व सारा तसेच जवळच्या काही नातेवाईकांसह गोव्याच्या एका खास फार्मस्टे मध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पोहोचला होता. माचली फार्म स्टे म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील या खास जागेची एक झलक व काही खास वैशिष्ट्य आज आपण पाहणार आहोत. तुम्हालाही तुमच्या एखाद्या खास दिवसाच्या निमित्ताने कधी खास कोकण ट्रिप करायची असल्यास त्यासाठी सर्व आवश्यक माहिती सुद्धा खाली देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकर्‍यांना विश्रांतीसाठी शेतात बांधलेल्या तात्पुरत्या मचाणांवरून याचे नाव माचली असे ठेवण्यात आले आहे. मालवण किनारपट्टीवर 10 एकर शेतात वसलेल्या या फार्म स्टे मध्ये तब्बल ६ कॉटेज असून या सर्वांचे नाव नक्षत्रांवरून ठेवण्यात आले आहे. इथे तुम्हाला सुपारी, आंबा, नारळ, मसाल्याची झाडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळू शकतात. प्रवीण व प्रिया सामंत या यजमानांची जोडी व त्यांचा सुपुत्र प्रथमेश हे तुम्हाला जवळपासच्या ट्रेकमध्ये मार्गदर्शन करण्यात मदत करू शकतात.

जेवणासाठी स्थानिक उपलब्ध असलेल्या सेंद्रिय भाज्यांनी बनवलेले पारंपारिक मालवणी पदार्थ, मातीच्या चुलीवर शाजीवून पद्धतशीर केळीच्या पानात वाढले जाते.

मालमत्तेवरील कॉटेजमध्ये एसी नसले तरी क्रॉस-व्हेंटिलेशनसाठी डिझाइन केलेले आहे, जे उन्हाळ्यातही आतील भाग थंड आणि आरामदायक ठेवण्यास मदत करतात.

इथे वाय-फाय किंवा टेलिव्हिजन नाही आणि मोबाइल नेटवर्क खराब असू शकते. भोगवे बीच, खवणे समुद्रकिनारा आणि किल्ले निवाते बीच व सिंधुदुर्ग किल्ला हे प्रेक्षणीय स्थळे हाकेच्या अंतरावर आहेत.

फार्मस्टे सोलो ट्रॅव्हलर्स, जोडपे आणि मुलांसह कुटुंबांसाठी उपयुक्त आहे. ही मालमत्ता सर्व ज्येष्ठांसाठी सोयीस्कर आहेच असे नाही. पार्किंगपासून प्रवेशद्वारापर्यंत २०० मीटर चालणे आहे जेथे पाहुण्यांना सुपारीच्या खोडांनी बनलेला पूल पार करावा लागेल.

हे ही वाचा<< तुडुंब भरलेल्या नाल्यात किस करत केलं फोटोशूट? ‘या’ कपलचे Video, फोटो पाहून लोकं का करतायत कौतुक?

परुळे येथील माचली होमस्टे सिंधुदुर्ग विमानतळापासून फक्त ५-६ मिनिटांच्या अंतरावर आहे. तर रस्त्याने येत असल्यास मुंबईपासून १२ तास, पुण्यापासून आठ तास आणि पणजी, गोवा येथून सुमारे दोन तास इतके अंतर आहे. नाश्त्यासह ८,५०० रुपयांपासून सुरु होणारे पॅकेज आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar visit maachli farm stay with sara anjali tendulkar price for one day picnic food cottages pictures near mumbai pune svs
First published on: 16-05-2023 at 10:37 IST