उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून २५ सप्टेंबर रोजी एक हृदयद्रावक किस्सा समोर आला आहे. येथे राहणारा एक साधू गळ्यात काळा विषारी साप गुंडाळून इन्स्टाग्रामच्या रील निर्मात्यांसाठी पोज देत होता. यादरम्यान सापाने त्याला चावा घेतला, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्याला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मध्ये रेफर केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

धक्कादायक घटना

ही घटना शुक्रवारी घडली होती, मात्र शनिवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे उघड झाले. हा साधू काकोरी (लखनऊ) येथील बनिया खेरा गावचा रहिवासी आहे, त्याचे नाव बजरंगी साधू असून तो ५५ वर्षीय आहे. तो औरस परिसरातील भावना खेरा गावात गेल्या काही वर्षांपासून राहत होता.

(हे ही वाचा: ‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर महिलेने असा ताल धरला की…तुम्हालाही थिरकण्याचा मोह आवरणार नाही)

जाणून घ्या संपूर्ण घटना

वृत्तानुसार, परिसरात पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या सुभेदाराच्या दुकानात एक विषारी काळा साप आढळून आला. सुभेदाराने काठीने सापाला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे पोहोचलेल्या बजरंगीने सुभेदाराला सापाला मारण्यास नकार दिला. त्यानंतर बजरंगीने सापाला पकडून पेटीत ठेवले आणि दुकानाबाहेर आणले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रीलसाठी देत होता पोझ

रील बनवण्याची इच्छा असलेल्या काही उत्सुक प्रेक्षकांनी विचारल्यानंतर बजरंगीने डब्यातून सापाला बाहेर काढले आणि त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि त्याच्यासाठी पोझ देऊ लागला. साधू कधी सापाला गळ्यात गुंडाळायचा तर कधी खांद्यावर आणायचा, या दरम्यान साप त्याला चावला.