सलाम! आज्जीला मागायची नाही भीक, पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतेय पेन

ही पोस्ट राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी व्ही यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

Grandma selling pen on street
ही पोस्ट व्हायरल झाली आहे (फोटो:@VSReddy_MP/ Twitter)

सोशल मीडिया अनेक लोकांच्या जीवनात एक आशा म्हणून आला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट व्यतिरिक्त, अशा अनेक गोष्टी वाचल्या जाऊ शकतात, ज्या उत्कृष्ट आणि हृदयस्पर्शी असतात. अलीकडेच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एक वृद्ध महिला तिच्या उदरनिर्वाहासाठी पेन विकताना दिसत आहे.

खासदारांची पोस्ट

या वृद्ध महिलेचे नाव रतन आहे. रतन पुण्याच्या एमजी रोडवर पेन विकते. ही पोस्ट राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी व्ही यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.” यासह त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की त्या वृद्ध स्त्रीने तिच्या पेनच्या बॉक्सवर लिहिले आहे की ‘मला भीक मागायची नाही. कृपया १० रुपयांना निळे पेन खरेदी करा. धन्यवाद, आशीर्वाद.’

( हे ही वाचा: Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी)

( हे ही वाचा: Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत. पोस्टला उत्तर देताना एका वापरकर्त्याने लिहिले आहे – पाहून खरोखर छान वाटले, ती महिला तिच्या अभिमानाशी तडजोड करत नाही.

या पोस्टला आत्तापर्यंत अनेकांनी बघितले आहे तर १०० हून अधिक लोकांनी या पोस्टला रीपोस्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salute grandma doesnt want to beg sold pens on the street to fill her stomach ttg

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या