सैन्यातील जवानांचे आयुष्य हे संकटांनी भरलेले असते, देशसेवेच्या रक्षणासाठी करताना त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आपल्या कुटुंबापासून पत्नीपासून दूर राहावं लागतं. यावेळी महिलांसमोर तर अनेक संकटे उभी असतात. त्यात मातृत्वाची जबाबदारी मोठी आणि देशसेवेचे कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे. यापैकी एकाची निवड करायची हे एक आव्हानच असते. मात्र सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये कार्यरत असणाऱ्या वर्षा रमेश मगदूम-पाटील यांनी मात्र देशसेवेची निवड केली आहे. भारतमातेच्या संरक्षणासाठी निघालेल्या या मातेचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरतं तेव्हा..

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या दहा महिन्याच्या मुलाला घरी सोडून बीएसएफमध्ये दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवरून ड्युटीवर हजर होताना त्यांच्या जीवाची चांगलीच घालमेल झाली. आईपण बाजूला ठेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी त्या निघून गेल्या. सध्या त्यांची पोस्टिंग राजस्थानमधील बाडमेर येथे असेल. २०२२ मध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नावही त्यांनी ‘दक्ष’ ठेवले. त्यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

हृदयस्पर्शी व्हिडीओ

हेही वाचा – ३० लाखांचं पॅकेज सोडून ‘हे’ जोडपं विकतंय समोसे, रोजची कमाई ऐकून व्हाल थक्क!

व्हिडीओमध्ये वर्षाराणी पाटील कर्तव्यावर निघण्याआधी सगळ्यांची भेट घेताना दिसत आहेत. यावेळी वर्षाराणी यांचे नातेवाईकांनाही यांनी अश्रू अनावर झालेत. वर्षाराणी सगळ्यांची गळाभेट घेत आहे. मात्र त्यांचे पती मोठ्या धीराने त्यांना तू काळजी करु नकोस असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दहा महिन्यांचा चिमुकल्याला सोडून जाताना एका आईची होणारी घालमेल डोळ्यात पाणी आणणारी आहे. शेवटी ट्रेन निघाल्यानंतर निरोप देताना वर्षाराणी यांचे अश्रू थांबत नव्हेत. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचं राज्यभरातून कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salute to the duty of the mother leaving the baby at home to protect the country eye watering video srk
First published on: 16-03-2023 at 15:49 IST