परिस्थिती भलेही बिकट असो पण जर मेहतन करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून दूर नाही हेच मोहन अभ्यासने दाखवून दिले. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची पण गरिबीवर मात करत मोहनने JEE मध्ये संपूर्ण देशातून सहावा क्रमांक पटकावला. तर आंध्रच्या अभियांत्रिकी, कृषि आणि वैद्यकीय संयुक्त परीक्षेत त्याने अव्वल स्थान पटकावले. मोहनच्या घरची परिस्थिती तशी बिकटच. मोहनचे वडील सामोसे विकून आपलं घर चालवतात. रोज सकाळी सामोसे विकण्यासाठी मोहनचे बाबा घराबाहेर पडतात. सामोसे विकून दिवसाकाठी त्यांना जे पैसे मिळतात त्यावरच त्यांचं घर चालतं. मोहनदेखील अभ्यासातून वेळ काढून वडिलांना सामोसे तयार करण्यासाठी मदत करतो. अभ्यास आणि घरातली कामं दोन्ही सांभाळत त्याने हे यश मिळवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन जेईईमध्ये देशातून सहावा आलाय. त्याला ३६० पैकी ३४५ गुण मिळालेत. मोहनला शिकून मोठं व्हायचं आहे, घरची परिस्थिती त्याला बदलायची आहे. आठवीत असल्यापासूनच जेईईच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात केल्याचेही त्याने सांगितले. मोहनला आयआयटी चैन्नईमध्ये शिकण्याची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने मोहनचे प्रयत्नही सुरू झाले आहेत.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samosa makers son mohan abhyas eamcet topper
First published on: 24-05-2017 at 18:08 IST