‘अॅपल’ आणि ‘सॅमसंग’ या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या. बाजारपेठेत सध्या दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोन्समध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. पण यावेळी ‘अॅपल’ आणि ‘सॅमसंग’ हे ब्रँड त्यांच्या दर्जेदार हँडसेटसाठी नाही तर एका जाहिरातीसाठी चर्चेत आले आहेत. दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अॅपलनं आपला बहुप्रतिक्षीत आयफोन X लाँच केला. हटके फीचर्समुळे हा फोन जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण सॅमसंगनं एका जाहिरातीमधून अॅपलला चिमटा काढला आहे.
भेटा भातुकलीच्या खेळामधल्या खऱ्याखुऱ्या ‘बाहुली’ला
सचिनच्या ‘त्या’ रांगोळीने रचला विक्रम
जाहिरात हे असं अस्त्र आहे ज्यामुळे एखादी कंपनी आपल्या उत्पादनाचा खप प्रचंड वाढवू शकते. त्यातून ती जाहिरात बोचरी आणि प्रतिस्पर्धी कंपनीवर टीका करणारी असेल तर मग विचारायची सोय नाही. नेमका हाच फंडा वापरून सॅमसंगनं अॅपलच्या मर्मावर बोट ठेवलं आहे. अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांचे फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण अशी अनेक फीचर्स आहेत जी अॅपल गेल्या दशकभरात आपल्या युजर्सना देऊ शकला नाही. अॅपलचे फोन निश्चितच ‘स्टेटस सिम्बल’ असतील पण काही बाबतीत मात्र सॅमसंग अॅपलपेक्षाही वरचढ आहे, असे ठसवण्याचा प्रयत्न सॅमसंगने केला आहे. सॅमसंगनं केलेली ही भन्नाट जाहिरात सोशल मीडियावर आयफोन Xपेक्षाही जास्त धुमाकूळ घालत आहे. अॅपलवर जाहिरातीमार्फत टीका करण्याची ही सॅमसंगची काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सॅमसंगने अनेकदा अॅपलवर अशाप्रकारची टीका केली आहे.
