Udayanraje Video Viral: साताऱ्याच्या राजघराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व राज्यसभेचे सदस्य असलेले उदयनराजे भोसले हे आपल्या चाहत्यांसाठी कधी कॉलर उडवतात, तर कधी गाणे देखील गातात. उदयनराजे नेहमीच अशाप्रकारे आपल्या चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात. खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाइल आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी काय करतील याचा नेम नाही. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होत आहे. मात्र आता त्यांचा एका छोट्या चाहत्याबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आता लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. यानिमित्तानी राजकीय हालाचालींना वेग आला असून नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली जात आहे. अशाच एका कार्यक्रमाला आलेल्या उदयनराजेंसोबत सेल्फीसाठी एका लहान मुलानं हट्ट केला. यावेळी उदयनराजेंनी केलेली टिप्पणी सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, उदयनराजेंच्या भोवती सगळ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. यावेळी हा चिमुकला मोबाईल घेऊन त्यांच्याजवळ येतो. तेव्हा राजे त्याला अरे इकडे एवढ्या चिकण्या पोरी आहेत आणि माझ्यासोबत कशाला सेल्फी घेतोय. यावर तिथे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकतो. पुढे तो मुलगा फोटोसाठी हसा की असं म्हणत अखेर उदयनराजेंसोबत सेल्फी काढतोच.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शाब्बास! लेकानं आईला घडवली दुबईची सैर; आईला भारताबाहेर घेऊन यायचं स्वप्न पूर्ण झालं; माय-लेकाचा VIDEO व्हायरल

उदयनराजे गाडीत बसले आणि त्यांनी नेहमीच्या ठेक्यात कॉलर उडवून उपस्थितांची मनं जिंकली. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप गाजतोय. डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल यामुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये ‘फेमस’ आहेत. एकदा तर त्यांनी चक्क पुष्पा स्टाइल डायलॉग मारला होता. तसंच पुष्पा चित्रपटातील गाण्यावर त्यांच्या शैलीत कॉलर उडवून फ्लाइंग किसही केला होता.